पाळणाघरात मुलाला टाकून महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:53 AM2018-01-20T01:53:33+5:302018-01-20T01:53:35+5:30

डोंबिवलीनजीक निळजे येथे घरगुती पाळणाघर चालवणा-या महिलेकडे याच परिसरातील महिलेने मूल सांभाळण्यास दिले होते.

The girl's disappearance of the child in the cradle | पाळणाघरात मुलाला टाकून महिला बेपत्ता

पाळणाघरात मुलाला टाकून महिला बेपत्ता

Next

डोंबिवली : डोंबिवलीनजीक निळजे येथे घरगुती पाळणाघर चालवणा-या महिलेकडे याच परिसरातील महिलेने मूल सांभाळण्यास दिले होते. पण चार महिने उलटूनही ती त्याला घरी नेण्यास आली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. याप्रकरणी पाळणाघर चालवणाºया महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
‘शंकुतला सृष्टी’त राहणाºया किरण शेट्टी यांच्या पाळणाघरात त्याच परिसरातील जान्हवी हिने पाच वर्षांच्या मुलाला ठेवले होते. सुरुवातीला इतर पालकांप्रमाणेती मुलाला तेथे सोडण्यास व आणण्यास येत होती. मात्र आॅगस्टपासून ती मुलाला घेण्यासाठी पुन्हा आलीच नसल्याचे शेट्टी यांचे म्हणणे आहे. शेट्टी यांनी वारंवार तिच्याशी संपर्काचा प्रयत्न केला. पण ती फोनवर बोलणे टाळत असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबरमध्ये संपर्क झाल्यावर तिने मुलाला नेण्यास नकार देत आता त्याला मी सांभाळू शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी हा प्रकार सोसायटीतील रहिवाशांना सांगितला.
कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर हा प्रकार समजताच त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुरु वारी सकाळी स्थानिक नगरसेवक प्रभाकर जाधव आणि मनसे तालुका उपाध्यक्ष गजानन पाटील, सोसायटीतील रहिवाशांसह शेट्टी यांच्या घरी जाऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सर्व हकीकत भोईर यांना सांगितली. दरम्यान, मुलाला सोडून बेपत्ता झालेल्या महिलेची तक्रार मानपाडा पोलिसात करण्यात आली आहे.
ठाणे सिव्हिल रुग्णालयात बाळ चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर निळजे परिसरातील पाळणाघरातून एका लहान मुलाला घरी सोडले जात नाही. तो गेले अनेक महिने तिथेच असल्याची शंका तेथील रहिवाशांना आली होती. यातील एकाने मला दूरध्वनी करून माहिती दिली असता खातरजमा केली. त्यात ही धक्कादायक बाब उघड झाल्याचे उपमहापौर भोईर यांनी सांगितले.

Web Title: The girl's disappearance of the child in the cradle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.