उल्हासनगर : स्टेशन परिसरातुन काही व्यक्ती सफारी बॅगमध्ये प्रतिबंधित गुटखा बुधवारी सकाळी घेऊन जाणार असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून एकूण ६ जणांना ताब्यात घेतले. एकूण १ लाख ६५ हजाराचा गुटखा जप्त केला असून ताब्यात घेतलेल्या ६ मध्ये ३ महिलांनाचा समावेश आहे.
उल्हासनगरात गेल्या आठवड्यात मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडी टाकून ३० पेक्षा जास्त जणांना अटक केली. तर विठ्ठलवाडी पोलिसांनी बुधवारी सकाळी उल्हासनगर स्टेशनला परिसरातून एका बॅग मध्ये गुटखा घेऊन जाणाऱ्या एका टोळीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. ताब्यात घेतलेल्या सहा जणा मध्ये ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या टोळीवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुटखा कुठून आणला व कुठे नेण्यात येत होता. याबाबतची चौकशी पोलीस करीत होते. जप्त केलेल्या गुटक्याची किंमत १ लाख ६५ हजार रुपयाची असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. अटक केलेल्या ३ पुरुष आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.