हिंदी भाषिक भवन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:06 AM2017-07-31T00:06:42+5:302017-07-31T00:06:42+5:30

मराठी माणसाच्या हिताची भाषा करणाºया शिवसेनेने मीरा-भार्इंदरमधील मतदारांना आकर्षित करण्याकरिता मराठीबरोबर हिंदी भाषेत आपला वचननामा तर प्रकाशित केलाच,

haindai-bhaasaika-bhavana-ubhaaranaara | हिंदी भाषिक भवन उभारणार

हिंदी भाषिक भवन उभारणार

Next

ठाणे : मराठी माणसाच्या हिताची भाषा करणाºया शिवसेनेने मीरा-भार्इंदरमधील मतदारांना आकर्षित करण्याकरिता मराठीबरोबर हिंदी भाषेत आपला वचननामा तर प्रकाशित केलाच, पण आगरी-कोळी भवनाबरोबर हिंदी भाषिक भवनाची उभारणी करण्याचेही आश्वासन दिले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १५ वर्षांपूर्वी मुंबईतील वाढता हिंदी भाषिक माणूस जोडण्याकरिता ‘मी मुंबईकर’ अभियान राबवले होते. १५ वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत वास्तव्य करणाºया हिंदी भाषिकांना सोबत घेण्याचा उद्धव यांचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे उधळला गेला. मात्र, मध्येमध्ये शिवसेना मनसेच्या धास्तीमुळे कडवी मराठीची भूमिका घेते. मात्र, मीरा-भार्इंदरकरिता शिवसेनेने मराठीमायबरोबर हिंदी मावशीलाही आपलेसे केले आहे.
मीरा-भार्इंदरसाठी मेट्रो, क्लस्टर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, बाळासाहेब ठाकरे कलादालन, आगरी-कोळी भवन व हिंदी भाषिक भवन, आदिवासी विद्यार्थी वसतिगृह, नवघर-कनकिया आणि घोडबंदर चौपाटी, घोडबंदर किल्ला परिसरात शिवसृष्टी, नाट्यगृह, आरमार केंद्र, रोरोसेवा, कचरा व्यवस्थापन, युवक कल्याण व शिक्षण अशा एक नाही तर अनेक योजनांचा शिवसेनेच्या वचननाम्यात समावेश आहे. आदिवासी, कोळी, मागासवर्गीय समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न शिवसेनेने या वचननाम्याच्या माध्यमातून केला आहे. शिवाय, सध्या सुरू असलेल्या तर काही पूर्णत्वास येत असलेल्या कामांचा उल्लेख शिवसेनेने आवर्जून केला आहे. परंतु, हा वचननामा मीरा-भार्इंदरमध्ये प्रसिद्ध न करता ठाण्यात प्रसिद्ध करण्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे. शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले. या वेळी हायलॅण्ड पार्क येथील शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांच्या कार्यालयात ठाकरे यांच्या हस्ते या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
मीरा-भार्इंदरमधील धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर योजना मंजूर करून घेऊ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनाच्या कामाला सुरुवात होणार असून बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्यासाठी पालिकेने २५ कोटींची तरतूद केल्याचे नमूद केले. आरमार केंद्र आणि गं्रथालय, तरणतलाव व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदींचा उल्लेखही करण्यात आला आहे. परंतु, यातील अनेक कामे अंतिम टप्प्यात असून काही कामे मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत, तर काही कामे प्रस्तावित करण्यात आली असून अशा काही जुन्याच बाबींचा उल्लेख शिवसेनेने आपल्या वचननाम्यात केला आहे. सर्वप्रथम शिवसेनेचाच वचननामा प्रसिद्ध झाला.

Web Title: haindai-bhaasaika-bhavana-ubhaaranaara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.