डोंबिवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हॅलीकॉप्टर लँड झाल्याची माहती व्यासपीठावरून देण्यात आल्यानंतर सभामंडपात आणि बाहेरच्या बाजूला सर्वत्र प्रचंड जयघोष झाला, नारेबाजी झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष झाला, अनेकांनी २०१४ च्या निवडणुकीमधील हर हर मोदी घर घर मोदीच्या घोषणा देत, जय श्रीराम चा हुंकार देण्यात आला. श्रीराम मंदिर कायदा करा अशीही नारेबाजी करण्यात आली. प्रचंड जल्लोषात कार्यकर्त्यांनी मोदींचे स्वागत केले, काही काळ घोषणा सुरूच होत्या, मोदींनी देखिल मनसोक्त हात वर करत कार्यकर्त्यांना साद दिली. त्याचा परिणाम बाहेर उभे असलेल्या हजारो कार्यकर्त्यांवर झाला, जागा मिळेल तिथे कार्यकर्ते एलईडीसमोर उन्हात, काही जण समोरच्या रस्त्यानजीकच्या पदपथावरील झाडांच्या सावलीचा आसरा घेत उभे होते. आठ मुख्य ठिकाणी काही अंतरांवर एलईडी व्हॅन उभ्या करण्यात आल्या होत्या, मुख्य सभामंडपातील व्यासपीठावरचे सर्व क्षणचित्रे त्या ठिकाणी लाइव्ह दाखवण्यात आली होती.
- बापगावच्या मोकळया भुखंडावर हॅलीपॅडच्या ठिकाणी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह विविध मान्यवर तेथे गेले होते. त्यावेळी पंतप्रधानांनी सगळया आमदारांसमवेत आणि खासदार कपिल पाटील यांच्यासमवेत हस्तांदोलन करत आनंद व्यक्त केला. काही क्षण चर्चा करत त्यांनी दुपारी २.४०नंतर फडके मैदानाकडे कूच केली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रचंड पोलिस बंदोबस्त ताफा पुढे सरकला. त्यामुळे रस्त्यावरही ठिकठिकाणी मोदी भक्त उभे होते, त्यांनीही मोदींना बघण्यासाठी एकच गर्दी केली, पण गाड्यांच्या ताफ्यात नेमक्या कोणत्या गाडीत पंतप्रधान बसले होते, हे न कळाल्यानेही काहींचा भ्रमनिरास झाला....मोदींच्या भाषणाला पेंडॉलमधील गर्दी झाली कमीसकाळी ११ वाजल्यानंतर सभामंडपात हळुहळु गर्दी झाल्यानंतर मात्र बसण्यासही जागा नसल्याने अनेकांना दुर्गाडी किल्यानजीकच्या चौकाजवळ पेंडॉल टाकण्यात आला होता, त्या ठिकाणीही सुमारे १ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती,उन्हात ताटखलत उभे राहण्यापेक्षा काहींनी त्या पेंडॉलमध्ये जाणे पसंत केले, तेथे मोठी एलईडी स्क्रिनची व्यवस्थ होती, त्यामुळे तेथे काही काळ गर्दी झाली होती. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर मात्र पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या वेळी मात्र नागरिकांनी खुर्च्या रिकाम्या केल्याचे चित्र होते. त्यानंत काही वेळात पेंडॉल काहीसा रिकामा झाला होता. मोकळया खुर्च्या सगळयांचे लक्ष वेधून घेत होत्या, आणि तो एक चर्चेचा विषय बनला होता.