आप्तांचा रुग्णालयाला घेराव

By Admin | Published: March 3, 2016 01:58 AM2016-03-03T01:58:24+5:302016-03-03T01:58:24+5:30

तारापुर अणुऊर्जा केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश आरेकर (६६) या अ‍ॅनजिओप्लास्टी झालेल्या रूग्णाला पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असतांनाही

The hospital's surroundings | आप्तांचा रुग्णालयाला घेराव

आप्तांचा रुग्णालयाला घेराव

googlenewsNext

पंकज राऊत,  बोईसर
तारापुर अणुऊर्जा केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश आरेकर (६६) या अ‍ॅनजिओप्लास्टी झालेल्या रूग्णाला पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असतांनाही त्यांच्यावर अतिदक्षता विभागाऐवजी सर्वसाधारण वॉर्डात उपचार केल्याने आरेकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करून जो पर्यंत डॉक्टरांवर कारवाइ्र होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार नातेवाईकांनी केला आहे.
सुरेश आरेकर यांची अ‍ॅँजिओप्लास्टी डिसेंबर २०११ ला झाली होती. काल (दि. १) दुपारी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या रूग्णालयात चारच्या सुमारास दाखल केले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास ते अत्यवस्थ होऊन त्यांचा मध्यरात्री दीड वाजता मृत्यू झाला.
मृत्यूची बातमी पसरताच आरेकर यांचे नातेवाईक मित्रपरीवार, शिवसेनेचे पदाधिकारी सुधीर तामोरे, संजय तामोरे यांच्यासह अणुऊर्जा केंद्राचे कर्मचारी कामावर न जाता रूग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने जमले. संतप्त नातेवाईकांनी आणि सेना पदाधिकाऱ्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची व अणुऊर्जा कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल मधील सेवांचा दर्जा सुधारण्याची मागणी करून हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची पोस्ट बघून ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप केला.
दरम्यान अणुऊर्जा व रूग्णालय प्रशासनाने मृत रूग्णाच्या नातेवाईकांशी अनेक वेळा चर्चा करून मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली परंतु नातेवाईक संबंधीत डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे. यामागणीवर ठाम राहीले.
दुपारी साडेबाराच्या सुमारास आ. अमीत घोडा ही दाखल झाले. त्यांनीही नातेवाईकांना सोबत घेऊन प्रशासनाशी चर्चा केली. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने टॅप्सचे साईट डायरेक्टर हेमंत कुमार यांनी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण समजेल त्याप्रमाणे लाईन आॅफ ट्रीटमेंट योग्य होती की नाही हे कळेल, इंटर्नल व एक्सस्टर्नल कमीटीद्वारे निपक्षपातीपणे इनव्हेस्टीगेशन करू त्यामध्ये डॉक्टर दोषी आढळले तर निश्चित कारवाई करू असे त्यांनी सांगितले. परंतु यावर नातेवाईकांचे समाधान न झाल्याने तारापूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यासाठी ते निघून गेले.
त्यानंतर तारापूर पोलीसांनी शवविच्छेदनाकरीता मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला तर शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी सांगितले. मात्र तोपर्यंत नातेवाईक डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे यावर ठाम होते.

Web Title: The hospital's surroundings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.