शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

आप्तांचा रुग्णालयाला घेराव

By admin | Published: March 03, 2016 1:58 AM

तारापुर अणुऊर्जा केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश आरेकर (६६) या अ‍ॅनजिओप्लास्टी झालेल्या रूग्णाला पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असतांनाही

पंकज राऊत,  बोईसरतारापुर अणुऊर्जा केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश आरेकर (६६) या अ‍ॅनजिओप्लास्टी झालेल्या रूग्णाला पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असतांनाही त्यांच्यावर अतिदक्षता विभागाऐवजी सर्वसाधारण वॉर्डात उपचार केल्याने आरेकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करून जो पर्यंत डॉक्टरांवर कारवाइ्र होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार नातेवाईकांनी केला आहे.सुरेश आरेकर यांची अ‍ॅँजिओप्लास्टी डिसेंबर २०११ ला झाली होती. काल (दि. १) दुपारी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या रूग्णालयात चारच्या सुमारास दाखल केले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास ते अत्यवस्थ होऊन त्यांचा मध्यरात्री दीड वाजता मृत्यू झाला.मृत्यूची बातमी पसरताच आरेकर यांचे नातेवाईक मित्रपरीवार, शिवसेनेचे पदाधिकारी सुधीर तामोरे, संजय तामोरे यांच्यासह अणुऊर्जा केंद्राचे कर्मचारी कामावर न जाता रूग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने जमले. संतप्त नातेवाईकांनी आणि सेना पदाधिकाऱ्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची व अणुऊर्जा कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल मधील सेवांचा दर्जा सुधारण्याची मागणी करून हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची पोस्ट बघून ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप केला.दरम्यान अणुऊर्जा व रूग्णालय प्रशासनाने मृत रूग्णाच्या नातेवाईकांशी अनेक वेळा चर्चा करून मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली परंतु नातेवाईक संबंधीत डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे. यामागणीवर ठाम राहीले. दुपारी साडेबाराच्या सुमारास आ. अमीत घोडा ही दाखल झाले. त्यांनीही नातेवाईकांना सोबत घेऊन प्रशासनाशी चर्चा केली. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने टॅप्सचे साईट डायरेक्टर हेमंत कुमार यांनी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण समजेल त्याप्रमाणे लाईन आॅफ ट्रीटमेंट योग्य होती की नाही हे कळेल, इंटर्नल व एक्सस्टर्नल कमीटीद्वारे निपक्षपातीपणे इनव्हेस्टीगेशन करू त्यामध्ये डॉक्टर दोषी आढळले तर निश्चित कारवाई करू असे त्यांनी सांगितले. परंतु यावर नातेवाईकांचे समाधान न झाल्याने तारापूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यासाठी ते निघून गेले.त्यानंतर तारापूर पोलीसांनी शवविच्छेदनाकरीता मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला तर शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी सांगितले. मात्र तोपर्यंत नातेवाईक डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे यावर ठाम होते.