कल्याण : कोरोनाकाळात गर्दी टाळणे व पर्यावरणाचे संतुलन राखणे, या दुहेरी उद्देशाने कल्याण-डोंबिवली मनपा तीन वर्षांपासून विसर्जन आपल्या दारी हा उपक्रम राबवित आहे. यंदा त्या अंतर्गत दोन हजार ११५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
मनपाने ६८ ठिकाणी विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. तसेच मनपाने विसर्जन आपल्या दारी उपक्रमासाठी १० प्रभाग क्षेत्रांत प्रत्येकी एक गाडी ठेवली होती. त्यात स्वच्छ पाण्याची टाकी होती. भाविकांनी संपर्क साधल्यास विसर्जनासाठी ती गाडी त्यांच्या घराजवळ येते. या उपक्रमांतर्गत ‘अ’ प्रभागात १९, ‘ब’ प्रभागांत ४५१, ‘क’ प्रभागात एक हजार ४७१, ‘जे’ प्रभागात ३४, ‘ड’ प्रभागात ४०, ‘ग’ प्रभागात ४६, ‘ह’ प्रभागात २५, ‘आय’ प्रभागात २५ आणि ई प्रभागात ४४ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
मनपा हद्दीत दीड ते पाच दिवसांपर्यंत २६ हजार २८० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी दोन हजार १५५ गणेशमूर्ती विसर्जन आपल्या दारी अंतर्गत विसर्जित केल्या गेल्या.
६० टन निर्माल्य संकलित
दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी २५ टन व पाच दिवसांच्या विसर्जनानंतर ३५ टन, असे एकूण ६० टन निर्माल्य संकलित करण्यात आले. हे निर्माल्य मनपाच्या उंबर्डे येथील कचरा प्रकल्पात खत तयार करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.
---------------