भिवंडीत परीक्षेत प्रश्नांची उत्तरे सांगितली नसल्याच्या रागाने चाकू हल्ला
By नितीन पंडित | Published: March 27, 2024 06:03 PM2024-03-27T18:03:57+5:302024-03-27T18:04:42+5:30
याप्रकरणी जखमी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन पंडित, भिवंडी: परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रात प्रश्नांची उत्तरे सांगितली नसल्याच्या रागाने विद्यार्थ्यांवर मित्रांनी मारहाण करून चाकू हल्ला केल्याची खळबळ जनक घटना शहरातील साफिया हायस्कूल बाहेर मंगळवारी घडली आहे.याप्रकरणी जखमी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसिफ साजिद शेख व १६ वर्ष रा. भोईवाडा पोलीस स्टेशनच्या बाजूला असे जखमी युवकाचे नाव असून त्याने परीक्षेमध्ये पेपर मधील उत्तरे सांगितली नसल्याचा राग धरत रेहान, शाहिद व त्यांचा एक साथीदाराने आसिफ हा पेपर संपल्यानंतर साफिया हायस्कूलच्या बाहेरील रस्त्यावर उभा असताना रेहान याने परीक्षेमध्ये पेपरची उत्तरे का सांगितली नाही अशी विचारणा करून मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यानंतर शाहिद याने त्याच्या हातातील चाकूने आसिफ च्या उजव्या दंडावर दुखापत केली तर तिसऱ्या एका मित्राने देखील धक्का बुक्क्यांनी मारहाण केली.
या झटापटीत जखमी आसिफ याचा मोबाईल देखील गहाळ झाला आहे. याप्रकरणी आसिफने रेहान,शाहिद व त्यांचा एक साथीदार अशा तिघां विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.