जिल्ह्यातील निर्यातीचे १० हजार कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाच्या हालचालींना जाेर

By सुरेश लोखंडे | Published: September 8, 2023 05:41 PM2023-09-08T17:41:13+5:302023-09-08T17:41:24+5:30

ठाणे जिल्ह्यात निर्यातीला मोठा वाव आहे. जिल्ह्यातील मिलेट व वस्त्रोद्योग पदार्थांची निर्यात वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी तज्ञांनी अहवाल द्यावा, असे निर्देश शिनगारे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे

In order to reach the target of 10000 crores of export in the district, the administration's actions are related | जिल्ह्यातील निर्यातीचे १० हजार कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाच्या हालचालींना जाेर

जिल्ह्यातील निर्यातीचे १० हजार कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाच्या हालचालींना जाेर

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यातील निर्यातीचे दहा हजार कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. निर्यात वाढीसाठी उद्योगांना उत्पादनाचे ब्रॅंडिंग, पॅकेजिंग इ.साठी मदत केली जाईल. जिल्ह्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रात किती उद्योजक आहेत, किती कामगार काम करत आहेत, याची माहिती गोळा करावी. निर्यात का कमी झाली याचा शोध घेऊन अहवाल देण्याच्या सूचना ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय पीएम मित्रा अंतर्गत ठाणे जिल्ह्यात मिनी टेक्स्टाईल पार्क उभारता येईल का याचा विचार करावा, असेही त्यांनी   अधिकार्यांच्या लक्षात आणून दिले. त्यासाठी अधिकार्याऔमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील निर्यात वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेची  शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच एक बैठकही पार पडली. या बैठकीत निर्यात वाढवण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन शिनगारे यांनी केले.त्यानुसार अधिकारी झपाट्याने कामाला लागले आहेत. यासाठी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वि.मु. सिरसाठ, व्यवस्थापक सचिन मेमाणे, उद्योग अधिकारी एस.बी. गायकवाड, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुधांशूकुमार अश्विन, जिल्हा कृषि अधिकारी दीपक कुटे, कोसियाचे निनाद जयवंत, टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर असोशिएशनचे पुनित खेमकिया, संतोष पगारे यांच्यासह वस्त्रोद्योग व तृणधान्य प्रक्रिया उद्योगाचे प्रतिनिधी तसेच डीजीएफटी, मप्रनि मंडळ, एमएसइडीसीएल, एमआयडीसी, अपेडा,जीएसटी, अंबरनाथ असोसिएशनचे अधिकारी आदी अधिकार्यांना शिनगारे यांनी निर्यात वाढीचे धडे दिले आहे. 

ठाणे जिल्ह्यात निर्यातीला मोठा वाव आहे. जिल्ह्यातील मिलेट व वस्त्रोद्योग पदार्थांची निर्यात वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी तज्ञांनी अहवाल द्यावा, असे निर्देश शिनगारे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. सन २०२३ वर्ष हे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष आहे. याअनुषंगाने केंद्र शासनाने ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मिलेट उद्योजकांचा समावेश केला आहे. मिलेट उत्पादन वाढविणे व त्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थांची निर्मिती व निर्यातीवर लक्ष द्यावे. यासंदर्भात सीएफटीआरआय म्हैसूर, परभणी कृषि विद्यापीठ, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संस्थेमार्फत संबंधित उद्योजकांना प्रशिक्षण देता येईल का याबद्दल आराखडा तयार करण्याच्या सूचना ही शिनगारे यांनी केल्या.

जिल्ह्यातील मिलेट पदार्थांच्या उत्पादकांना एकत्र आणून त्यांची संघटना तयार करण्याकरिता पुढाकार घेण्याचे सूचित केले. यावेळी टेक्सस्टाईल व मिलेट पदार्थ उत्पादकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे शिनगारे यांनी सांगितले.
 

Web Title: In order to reach the target of 10000 crores of export in the district, the administration's actions are related

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.