लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापौर लिलाबाई अशान यांच्या हस्ते महापालिका प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ.राजा दयानिधी, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, प्रकाश जाधव उपस्थित होते.
उल्हासनगर उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांच्या हस्ते कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त डी.टी.टेळे यांच्यासह विविध पक्षांचे स्थानिक नेते, नगरसेवक उपस्थित होते. पोलीस उपायुक्त कार्यालय प्रांगणात पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, तहसील कार्यालय प्रांगणात तहसीलदार विजय वाकोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महापालिकेत महापौर लिलाबाई अशान यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर, राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेते अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांच्यासह डेप्युटी चीफ ऑफिसर पंकज पवार, स्टेशन अग्निशमन ऑफिसर संदीप आसेकर व राजेंद्र राजन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्त व महापौरांनी अग्निशमन दलाच्या कामाचे कौतुक केले. महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जीमचे उद्घाटन केले, तसेच शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यलये, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, राजकीय पक्षाचे कार्यालय याच्या प्रांगणातही ध्वजारोहण करण्यात आले.