स्वातंत्र्यदिनी झाला आपला माणूस मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:45 AM2021-08-17T04:45:54+5:302021-08-17T04:45:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वुई आर फॉर यू आणि नौपाडा युथ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आपला ...

On Independence Day, our man launched the campaign | स्वातंत्र्यदिनी झाला आपला माणूस मोहिमेचा शुभारंभ

स्वातंत्र्यदिनी झाला आपला माणूस मोहिमेचा शुभारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : वुई आर फॉर यू आणि नौपाडा युथ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आपला माणूस या मोहिमेचा शुभारंभ वुई आर फॉर यू चे अध्यक्ष किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या अंतर्गत ठाणे शहरातील मुख्य स्मशानभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहरबाग स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

कोरोनाकाळात गेल्या दीड-दोन वर्षांत स्मशानभूमीतील सर्वच बांधवांनी जीवावरचे संकट असून न डगमगता आपले कर्तव्य चोख बजावले आहे. त्यांच्या या कर्तव्याप्रति भावना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आपला माणूस मोहिमेंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे किट जवाहरबाग स्मशानभूमीतील बांधवांना वुई आर फॉर यू आणि नौपाडा युथच्या वतीने देण्यात आले. यावेळी वुई आर फॉर यू चे अध्यक्ष किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली वुई आर फॉर यू चे सेवेकरी विजय डावरे, महेश सुतार, ऋषीकेश केदार, अशोक कदम, रघुनाथ रसाळ, पांडुरंग पाटील, नौपाडा युथचे गजानन परब, अक्षय जोशी, आदित्य जाधव, अभिजित जाधव, अद्वैत मुळे आदी सहभागी झाले होते. या मंडळींनी कोरोनाकाळात ॲम्ब्युलन्सचालक, मृतदेह गुुंडाळणे, अग्निसंस्कार करणे, अस्थी व्यवस्थित ठेवणे यासारखी विविध कामे चोख केली.

बॉक्स

वुई आर फॉर यू संस्थेच्या आपला माणूस या मोहिमेंतर्गत समाजातील दुर्लक्षित परंतु समाजकार्य करणाऱ्या घटकांना सहकार्य केले जाणार आहे. त्याची सुरुवात स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना पुढील महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून करण्यात आली.

फोटो मेलवर

Web Title: On Independence Day, our man launched the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.