ठाणे : भारताला सर्वात मोठा धोका अंतर्गत सुरक्षेचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅ न्सर आहे, असे मत वरिष्ठ लेखक, वक्ते, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले. राष्ट्रभक्ती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. यावेळी ‘राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर हेमंत महाजन बोलत होते.
ए.पी. शाह महाविद्यालयात शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होेते. यावेळी संस्थेचे कैलास म्हात्रे, दत्ता घाडगे, सुरज दळवी, जितेंद्र ढाकणे, प्रमोद धुमाळ, वर्षा सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाजन म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षा ही अंतर्गत व बाह्य या दोन प्रकारांत मोडते. अंतर्गत सुरक्षेमध्ये नक्षलवाद, दहशतवादी कारवाया, छुपे युद्ध तसेच काश्मीर, पूर्वांचलमध्ये होणारी घुसखोरी इत्यादी विषय येतात. बाह्य सुरक्षेमध्ये जमिनीवरील सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा इत्यादी येतात. सध्या देशाची बाह्य सुरक्षा खूप चांगली आहे. आपल्या शेजारील चीन, पाकिस्तान, बांगलादेश यांच्याकडून भारताला धोका आहे. भारताला ७६०० किलोमीटर सागरी सीमा लाभली आहे. भारताच्या तिन्ही बाजूंना समुद्र असल्याने भारत आणि चीन यांच्यामध्ये डोकलाम विषयावरून वाद असला, तरी चीन भारतावर आक्रमण करण्याचा विचारही करू शकत नाही. चीनला लढाईचा अजिबात अनुभव नाही. १९७८ नंतर चीनची लढाई झाली नाही. लढाई झालीच तर चीन, पाकिस्तान, बांगलादेश व देशांतर्गत आक्रमण एकाच वेळी होऊ शकते. चीनची तेलवाहतूक ही भारताच्या समुद्री हद्दीजवळून होत असते. त्यामुळे लढाई झाली, तर चीनचा तेलपुरवठा भारत बंद करू शकतो. म्हणून, चीन भारतावर कधी आक्रमण करू शकत नाही. पाकिस्तानही युद्ध करू शकत नाही, म्हणून ते प्रॉक्झी वॉर करत आहेत. पाकिस्तानची स्थिती हलाखीची आहे. शिवाय, दहशतवादामुळे आंतरराष्ट्रीय दबावही खूप आहे, असे महाजन यांनी सांगितले.
भारताचे सध्याचे परराष्ट्र धोरण योग्य असल्याने शेजारी राष्ट्रे भारताच्या बाजूने आहेत. त्यामुळे बाह्य सुरक्षेबाबत भारताला चिंता करण्याची गरज नाही. भारताबाबत आंतरराष्ट्रीय शक्तीअंतर्गत लढाईमध्ये जास्त रस दाखवते, म्हणून अंतर्गत कारवाईच्या माध्यमातून त्रास देणे सुरू असते. भारतामध्ये विकासविरोधी गट खूप सक्रिय आहे. हे देशासमोर एक मोठे आव्हान आहे. अनेक प्रकल्प स्थानिक लोकांमध्ये गैरसमजुती पसरवून थांबवले जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये वादविवाद निर्माण केले जातात. जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून अंतर्गत सुरक्षा बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे चिनी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. त्यामुळे विकासावर फरक पडतो, असे महाजन म्हणाले.भारत सुपरपॉवर नक्की बनेलच्केंद्र सरकार लष्कराच्या बाबतीत चांगल्या योजना राबवत आहे. आपली सागरी सुरक्षा नक्कीच सुधारलेली आहे. आपल्या नॅशनल सिक्युरिटी गार्डची (एनएसजी) दहशत शेजारील राष्ट्रांमध्ये नक्कीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारत सुपरपॉवर नक्कीच बनेल.च्नागरिकांनी स्वच्छता ठेवली पाहिजे. सोशल मीडियातून चुकीच्या गोष्टी पसरवू नये. जर अनुचित प्रकार घडत असतील, तर पोलिसांना माहिती द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.च्कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जगदीश खैरालिया, जितेंद्र ढाकणे, दत्ता घाडगे यांनी परिश्रम केले.