मुंब्रा खाडीत रेतीचे मनमानी उत्खनन; संभाव्य धोके टाळण्यासाठी रेल्वेच्या सशस्त्र जवानांचा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 07:56 PM2019-02-14T19:56:57+5:302019-02-14T20:04:29+5:30
मुंब्रा खाडीत अवैध रेतीउत्खनन सुरूच ’ या मथळ्याखाली लोकमतने 8 फेब्रुवारी रोजी वृत्तप्रसिध्द करून यातील गांभीर्य निदर्शनात आणले आहे. या वृत्ताची दखल जिल्हा प्रशासनासह तहसीलदार कार्यालयाने वेळीच घेणो अपेक्षित होते. मात्र पुढील काही दिवस या ठिकाणी रेतीचे उत्खनन मनमानीपणो सुरूच होते. यामुळे आता या लोहमार्गालगतचा खाडी किनारा खिळखीळा करीत सक्शनपंपाने पोखरून रेतीचे उत्खन केले.
ठाणो : मुंब्रा खाडीत रेल्वेच्या जलद लोहमार्गाजवळील कांदळवन नष्ठ करून त्यातील रेती सक्शनपंपचा मनमानी वापर करून काढली जात आहे. रेतीसाठी या ठिकाणचा खाडीकिनारा पूर्णपूणो पोखरण्यात आला आहे. यामुळे जलद रेल्वेचा लोहमार्ग व पूलास धोका संभवण्याची दाट शक्यता आहे. यास वेळीच आळा घालण्यासाठी तहसीलदार कार्यालयाऐवजी आता रेल्वेनेच त्यांच्या सशस्त्रधारी जवानांचा पहारा सुरू केला आहे.
‘मुंब्रा खाडीत अवैध रेतीउत्खनन सुरूच ’ या मथळ्याखाली लोकमतने 8 फेब्रुवारी रोजी वृत्तप्रसिध्द करून यातील गांभीर्य निदर्शनात आणले आहे. या वृत्ताची दखल जिल्हा प्रशासनासह तहसीलदार कार्यालयाने वेळीच घेणो अपेक्षित होते. मात्र पुढील काही दिवस या ठिकाणी रेतीचे उत्खनन मनमानीपणो सुरूच होते. यामुळे आता या लोहमार्गालगतचा खाडी किनारा खिळखीळा करीत सक्शनपंपाने पोखरून रेतीचे उत्खन केले. याशिवाय खाडीचे पाणी देखील या ठिकाणी वळवले आहे. आता या ठिकाणी फार मोठे खड्डे होऊन लोकमार्गाला असलेल्या मातीची पकडही कमी झाली आहे.
ओसाड पडलेल्या या ठिकाणी आता रेती उत्खनास वेळीच आळा घालण्यासाठी आज या ठिकाणी सशस्त्र जवानाचा पहारा दुपारी 1 वाजता आढळून आला . तत्पुर्वी या रेतीमाफियांवर त्वरीत कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठाणो तहसीलदार यांना लेखी निवेदनही दिले. याची जाणीव होताच रेतीमाफियांनी आज त्यांचा ताथा तेथून अन्यत्र हलवलेला आढळून आहे. फास्ट ट्रॅकच्या बाजूला खारफुटी , कांदळवनाचे झुडपे नष्ट करु न रेती माफियांनी रात्रंदिवस रेतीचा उपसा केला. सुमारे सहा सक्शन पंप व डोझरव्दारे रेती काढली आहे. याकडे दुर्लक्ष करीत रेती माफियांवरील कारवायीचा केवळ फार्स करणा:या रेती पथकावर वेळीच कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरू लागली. मात्र प्रशासनाकडून त्याकडे डोळेझाक करून अद्यापही कारवाईचा बडगा उगारला नाही. जबाबदारी असलेल्या संबंधीत अधिका:यांवर वेळीच कारवाई न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा सूर मुंब्रा परिसरात ऐकायला मिळत आहे.
कांदळवनाचा बिनदिक्कत :हास सुरु आहे. प्रशासनाच्या या डोळे झाकपणामुळे न्यायालयाच्या आदेशांचा अवमान होऊन कांदळवन संरक्षत कायद्याचे उलंगन होत आहे. यामुळे संबंधीत परिसराची जबाबदारी असलेल्या अधिका:यांवर जिल्हा प्रशासनाने त्वरीत कारवाई होणो अपेक्षित आहे. मात्र प्रशासनाकडून या परिसराची जबाबदारी असलेल्या रेती पथकातील अधिकारी, कर्मचा:यास पाठिशी घालत असल्याचे वास्तव दिसून येत आहे. रेती माफियांसह या अधिका:यांनाही पाठिशी घालणा:या प्रशासनाच्या मनमानी विरोधात लवकरच तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता दिसून येत आहे.