ज्युपिटरला आता हव्यात वाहन सुविधा!    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:34 AM2017-07-31T00:34:09+5:302017-07-31T00:34:09+5:30

जिल्हह्यातील सुमारे २०० कुपोषित बालके दत्तक घेण्याचे आश्वासन  येथील प्रसिध्द ज्युपीटर रूग्णालयाने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दिले.

jayaupaitaralaa-ataa-havayaata-vaahana-sauvaidhaa | ज्युपिटरला आता हव्यात वाहन सुविधा!    

ज्युपिटरला आता हव्यात वाहन सुविधा!    

Next

ठाणे : जिल्हह्यातील सुमारे २०० कुपोषित बालके दत्तक घेण्याचे आश्वासन  येथील प्रसिध्द ज्युपीटर रूग्णालयाने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दिले. परंतु बरेच महिने उलटल्यानंतरही या रूग्णालयाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाही. डॉक्टराना ठिकठिकाणी जाण्यासाठी  वाहने व आवश्यक त्या सोयी सुविधांची मागणी करून या रूग्णालयाकडून बालके दत्तक घेण्याचे टाळाटाळ केले जात असल्याचे आरोग्य यंत्रणेने जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिले.
कुपोषित बालकाना सशक्त करून कुपोषणाचा कलंक मिटवण्यासाठी आश्वासनांची खैरात ज्युपीटर रूग्णालयाने केल्याचे जिल्हाधिकाºयांनी गाभा समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. पण त्यानुसार अद्याप काही ही केले नसल्याचे निदर्शनात येताच जिल्हाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 
त्यांना म्हणावे माझी गाडी न्या..., हवेतर लाल दिवा लावून देतो... त्यातून आदिवासी दुर्गम भागात जावून तज्ज्ञ डॉक्टरांकडून कुपोषित बालकांची आरोग्य   तपासणी करा...  हे सिरिअसली आहे... खोटे नाही... असे स्पष्ट करून जिल्हाधिकाºयांनी ज्युपीटरशी त्वरीत संपर्क साधण्याची जबाबदार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पीपाटील व भिवंडीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. धानके मॅडम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 
जिल्ह्यात खरे तर १०४ बालके कुपोषित आहेत. पण ज्युपीटरने २०० बालके स्वखर्चातून दत्तक घेण्याचा पुढाकार व्यक्त केला आहे. त्यास काही महिने उलटलेले आहे. तरी देखील या रूग्णालयाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाही. त्यांनी शब्द दिल्या प्रमाणे आरोग्य यंत्रणेने त्यांच्याशी सतत संपर्कही केला. पण रूग्णालयाकडून हालचाली झाल्या नाही. अखेर दुर्गम भागात जाणाºया डॉक्टरांना  ने - आण करण्यासाठी गाड्या व सोयी सुविधांची अपेक्षा या रूग्णालय व्यवस्थापनाने केल्याचे उघड झाले.  

Web Title: jayaupaitaralaa-ataa-havayaata-vaahana-sauvaidhaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.