केडीएमसीच्या अधिकाºयांनी टेक्नोसॅव्ही होण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:25 AM2017-07-31T00:25:55+5:302017-07-31T00:25:55+5:30
केडीएमसीच्या अधिकाºयांनी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करताना जास्तीतजास्त टेक्नोसॅव्ही होणे आवश्यक आहे, असे मत आयुक्त
डोंबिवली : केडीएमसीच्या अधिकाºयांनी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करताना जास्तीतजास्त टेक्नोसॅव्ही होणे आवश्यक आहे, असे मत आयुक्त पी. वेलरासू यांनी व्यक्त केले. संगणक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना महापालिकेतील विविध खात्यांच्या प्रमुखांनीही उपस्थित राहावे, असे आदेश त्यांनी दिले.
वेलरासू यांनी शनिवारी ही बैठक घेतली. ते म्हणाले, सध्या सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. तो विचारात घेता नागरिकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर तक्रारी छायाचित्रांसह नोंदवाव्यात. या तक्रारी संगणक विभागाने तत्काळ संबंधित अधिकाºयांना त्यांच्या ई-मेलवर पाठवाव्यात. अधिकाºयांनीही त्याची तातडीने दखल घेत ठरवून दिलेल्या कालावधीत या तक्रारींचा निपटारा करावा, तसा अहवाल पुन्हा संगणक प्रणालीवर टाकावा, असे आदेशही त्यांनी दिले. संगणक प्रणालीवर प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा दर १५ दिवसांनी घेणार असल्याचे ते म्हणाले. आयुक्तांच्या या निर्णयामुळे आता केडीएमसीकडे येणाºया तक्रारींचे निराकरण जलद गतीने होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिकेच्या संगणकीय विभागातर्फे नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जात आहेत. या सेवांच्या माध्यमातून कर, पाणीबिले स्वीकारणे, जन्ममृत्यू दाखले, करआकारणी, जलनि:सारण व मलनि:सारण, सफाई आदी सेवा पुरवल्या जात आहेत. याशिवाय, नागरिकांच्या तक्रारीदेखील आॅनलाइन अथवा नागरी सुविधेद्वारे स्वीकारल्या जातात. या प्राप्त तक्रारींचा निपटारा संबंधित विभागांचे अधिकारी किंवा कर्मचाºयांकडून ठरलेल्या मुदतीत कसा केला जातो, याचीही माहिती वेलरासू यांनी घेतली. आॅनलाइन तक्रारींची प्रणाली सोपी करण्याचे आदेश आयुक्तांनी संगणक विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांना दिले. नागरिकांना आॅनलाइन अर्ज करताना अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.