कल्याण : तुटलेले, गंजलेले, अशा दयनीय अवस्थेतील केडीएमटी बसथांबे कल्याण-डोंबिवलीत शहरांतील विविध भागांमध्ये पहायला मिळतात. परंतु, आता हे चित्र बदलणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आणि त्यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उच्च प्रतिचे स्टेनलेस स्टीलचे प्रवासी बसथांबे केडीएमटीकडून उभारण्यात येणार आहेत. याकामी अनुभवी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या परिवहन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.
कल्याण-डोंबिवली शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेला आहे. त्यामुळे केडीएमसी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास, व्यवस्थापन आणि सुशोभीकरण करणार आहे. परिवहन उपक्रम हा नागरिकांना वाहतूक सेवा पुरवणारा उपक्रम असल्याने ‘वाहतूक व्यवस्थापन’ या अंतर्गत परिवहन उपक्रमाची भूमिका स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये महत्त्वाची राहणार आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानक परिसरातील बसथांब्यांची उभारणी त्यांच्यावतीनेच केली जाणार आहे. परंतु, त्यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अन्यत्र बसथांब्यांची उभारणी केडीएमटी उपक्रमांतर्गत केली जाणार आहे. सद्यस्थितीला उपक्रमाचे १२४ बसथांबे आहेत. तर प्रस्तावित थांबे ११९ आहेत.संबंधित प्रस्तावानुसार बसथांब्यांची डागडुजी करणे, रंगरंगोटी करणे, फ्लोरिंग दुरुस्ती, स्वच्छता व आवश्यकतेनुसार नवीन बसथांबे उभारणी करणे आदी जबाबदारी कंत्राटदाराची राहणार आहे. याकामासाठी गुरुवारी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केडीएमसी हद्दीत १५० नवीन बसथांबे उभारण्यात येणार आहेत. परिवहन समितीच्या बैठकीत या प्रस्तावावरील चर्चेच्यावेळी २०० थांबे उभारावेत, अशी मागणी भाजप सदस्य संजय मोरे यांनी केली. तर या थांब्यावर बसक्रमांकासह बस कुठल्या मार्गावर धावणार, याचाही उल्लेख असावा, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.उत्पन्नवाढीसाठी होर्डिंग पॅनलद्वारे जाहिराती कराच्परिवहन उपक्रमाच्या गणेश घाट आगार, बाळासाहेब ठाकरे आगार (वसंत व्हॅली) आणि खंबाळपाडा आगारात होर्डिंग पॅनलद्वारे जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी ई निविदा प्रक्रियेद्वारे अनुभवी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावालाही गुरुवारच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.च्तिन्ही आगारांच्या दर्शनी भागात होर्डिंग उभारल्यास विविध संस्था परिवहन प्रशासनाकडे मागणी करतील आणि उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ होईल, असा प्रस्ताव ६ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या परिवहनच्या बैठकीत तत्कालीन सदस्य संतोष चव्हाण यांनी मांडला होता. त्याला समितीने मान्यता दिली होती. त्याप्रमाणे या प्रस्तावाची अंमलबजावणीसाठी कंत्राटदार नियुक्तीचा विषय प्रशासनाकडून गुरुवारी दाखल करण्यात आला.च्सध्या उपक्रमाच्या कार्यरत बस आणि बसथांब्यांवर जाहिरात प्रदर्शित करण्यात येत आहेत. परंतु, अद्यापी उपक्रमाच्या आगाराच्या चोहो-बाजूने होर्डिंगद्वारे जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी कोणत्याही कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले. यावर संबंधित प्रस्तावाला मान्यता देताना उपक्रमाचे आरक्षित असलेले इतरही भूखंड ताब्यात घेऊनही उत्पन्न वाढीसाठी उपक्रम राबवा, अशीही सूचना सदस्यांनी केली.