कल्याण रेल रोकोच्या गुन्ह्याचा तपास थंडावला : रेल्वे कर्मचा-यांचा समावेश असल्याने अडथळे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:26 PM2017-11-21T14:26:51+5:302017-11-21T14:38:28+5:30
गँगमनवर चोरीचा गुन्हा लावल्याचा कल्याण लोहमार्ग पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या रेल्वे कर्मचा-यांनी कल्याण स्थानकात रेल रोकोचा प्रयत्न केला. त्यामुळे १५ -२० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पण त्यास आता चार दिवस झाले तरीही पोलिसांनी संबंधितांवर कोणतीही कारवाई केलेली नसल्याने तपास थंडावल्याचे चित्र आहे. रेल रोकोचा प्रयत्न करणारे रेल्वे कर्मचारी असून त्यांना वेगळा न्याय का? अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरु आहे.
डोंबिवली: गँगमनवर चोरीचा गुन्हा लावल्याचा कल्याण लोहमार्ग पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या रेल्वे कर्मचा-यांनी कल्याण स्थानकात रेल रोकोचा प्रयत्न केला. त्यामुळे १५ -२० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पण त्यास आता चार दिवस झाले तरीही पोलिसांनी संबंधितांवर कोणतीही कारवाई केलेली नसल्याने तपास थंडावल्याचे चित्र आहे. रेल रोकोचा प्रयत्न करणारे रेल्वे कर्मचारी असून त्यांना वेगळा न्याय का? अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरु आहे.
विविध प्रवासी संघटनांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरु असून सर्वसामान्य प्रवाशांनी असे कृत्य केले असते तर त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली असती. तर मग रेल्वे कर्मचा-यांना वेगळा न्याय का दिला जात आहे? त्यांच्यावरही तातडीने कारवाई का केली जात नाही अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरु होती.
तपासाधिकारी माणिक साठे यांनीही तपास सुरु असून त्यात दोन दिवसांत फारशी गती नसल्याचे स्पष्ट केले. १५-२० जणांवर गुन्हे दाखल झाले असून साक्षीदारांची जबाब घेण्याचेही काम सुरु होते, पण सीसी कॅमे-यांचे फुटेज तपासा आणि कारवाई करा अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. तसेच गँगमनची चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्यामधून जे निष्पन्नास आले असेल त्यानूसार पोलिस कारवाई का करत नाहीत? रेल्वे कर्मचारी असल्याने चालढकलपणा सुरु आहे का? असे नानाविध सवाल अनुत्तरीतच आहेत. अद्यापतरी कोणताही निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया तपासाधिकारी साठे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.