भिवंडीत महिलांना कायमस्वरुपी रोजगारासाठी प्रकल्प उभारणार- कपिल पाटील

By नितीन पंडित | Published: March 3, 2023 07:59 PM2023-03-03T19:59:46+5:302023-03-03T19:59:54+5:30

'हिरकणीचा वारसदार असलेल्या महिलांनी आत्मविश्वासाने उद्योग व्यवसायात उतरून प्रगती करावी.'

Kapil Patil will set up a project for permanent employment of women in Bhiwandi | भिवंडीत महिलांना कायमस्वरुपी रोजगारासाठी प्रकल्प उभारणार- कपिल पाटील

भिवंडीत महिलांना कायमस्वरुपी रोजगारासाठी प्रकल्प उभारणार- कपिल पाटील

googlenewsNext

भिवंडीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून भिवंडी तालुक्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कायमस्वरुपी रोजगार मिळवून देण्यासाठी उत्तम प्रकल्प उभारण्याचा विचार केला जात आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी दाभाड येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्याप्रसंगी व्यक्त केली.

हिरकणीचा वारसदार असलेल्या महिलांनी आत्मविश्वासाने उद्योग व्यवसायात उतरून प्रगती करावी असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील,सिद्धेश पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष पी.के.म्हात्रे,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर,जिल्हा परिषदेच्या माजी सभापती श्रेया गायकर, माजी पंचायत समिती सभापती रवीना जाधव,श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर,अशोक सापटे आदींची उपस्थिती होती. 

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरात दूध व भाजीपाल्याला मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्रातील २२ टक्के लोकसंख्या याच पट्ट्यात राहत आहे. त्यादृष्टीकोनातून भाजीपाला व डेअरी व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावा. आगामी काळात भिवंडीतील महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी कायमस्वरुपी उभारण्याचा प्रयत्न आहे. महिलांनी मेहनत केल्यास त्यांना सहजपणे रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या वेळी महंत स्वामी चिंतानंद सरस्वती यांना ठाणे जिल्हा महंत भूषण, भगवान बाबुराव भोईर यांना ठाणे जिल्हा भजन भूषण पुरस्कार, सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व सुदाम हजारे, न्यायाधीश पदावर उत्तीर्ण रुणाली रंजना दयानंद पवार यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी आयोजित केलेल्या लकी ड्रॉमध्ये एका आदिवासी भगिनीला स्कूटीचे बक्षीस मिळाले.

Web Title: Kapil Patil will set up a project for permanent employment of women in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.