ठाणे - एककीडे ठाणे शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. मुबलक पाणी असतांनाही अनेक भागांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात ठाणे महापालिकेच्या तरण तलावांना रोज पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची गंभीर बाब शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली आहे. शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी शहरातील स्विमींग पुलांना कोणते पाणी वापरले जाते असा सवाल उपस्थित केला होता. याच्या अनुषगांना खाजगी तरण तलावांना बोअरवेलचे पाणी वापरले जात असल्याचे माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अर्जुन अहिरे यांनी दिली. दुसरीकडे महापालिकेच्यात तरण तलावांना मात्र रोज प्रत्येकी दिड लाख लीटर पाणी दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरात महापालिकेचे चार तरण तलाव आहेत, त्यानुसार सहा लाख लीटर पाणी या तलावांना होत आहे.शहरात आजच्या घडीला अनेक ठिकाणी नागरीकांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु असे असतांना तरण तलावांना पिण्याचे पाणी कशासाठी दिले जात आहे. असा सवाल मालती पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे या तलावांसुध्दा बोअरवेलचे पाणी देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानुसार पावले उचलली जातील असे आश्वासन पालिकेने दिले.
महापालिकेच्या चार तरण तलावांसाठी रोज सहा लाख लीटर पिण्याच्या पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 5:59 PM
ठाणे शहराच्या अनेक भागात पाण्याची समस्या असतांना महापालिकेच्या तरण तलावांना मात्र रोज सहा लाख लीटर पाणी दिले जात असल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाला आहे.
ठळक मुद्देशिवसेना नगरसेविकेने उपस्थित केला मुद्दाबोअरवेलचे पाणी वापरण्याचा घेतला जाणार निर्णय