सिंधी माध्यमाच्या शाळांना अखेरची घरघर

By admin | Published: March 2, 2016 01:53 AM2016-03-02T01:53:22+5:302016-03-02T01:53:22+5:30

शहरातील सिंधी माध्यमाच्या शाळांना अखेरची घरघर लागली आहे. या माध्यमाच्या ११ शाळांत अवघे ९०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

The last house in Sindhi medium schools | सिंधी माध्यमाच्या शाळांना अखेरची घरघर

सिंधी माध्यमाच्या शाळांना अखेरची घरघर

Next

सदानंद नाईक,  उल्हासनगर
शहरातील सिंधी माध्यमाच्या शाळांना अखेरची घरघर लागली आहे. या माध्यमाच्या ११ शाळांत अवघे ९०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र संख्या अशीच झपाट्याने कमी होत राहिली, तर येत्या पाच ते सात वर्षांत या शाळा इतिहासजमा होतील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या आकर्षणामुळे ही वेळ आली असून परिस्थिती अशीच राहिली तर पुढील काळात सिंधी भाषा केवळ बोलण्यापुरची राहील, अशी धास्ती त्या समाजातील धुरिणांना वाटते.
शहरात ५ लाख पेक्षा जास्त सिंधी समाज असून एकेकाळी सिंधी भाषेच्या शाळाची संख्या सर्वाधिक होती. सिंधी भाषे बद्दल कमी झालेले आकर्षन व प्रत्यक्षात मराठी व इंग्रजी भाषेचा होत असलेला वापर याच कारणीभुत ठरला आहे. बहुंताश सिंधी समाजाने सिंधी शाळेकडे पाठ फिरवून, इंग्रजी शाळा मध्ये प्रवेश घेतला आहे. सिंधी शाळे मध्ये शिकणे मागासलेपणाचे वाटू लागले आहे.
सिंधी माध्यमाच्या शाळा एका पाठोपाठ बंद पडून संपूर्ण शहरात फक्त ११ शाळा सुरू आहेत. मात्र त्यांनाही मुला अभावी शेवटची घरघर लागली आहे.
महापालिका शिक्षण मंडळा अंतर्गत सिंधी माध्यमाच्या २ शाळा असुन इयत्ता १ ते ७ मध्ये फक्त ५९ मुले शिल्लक राहिली आहेत. विद्यार्थ्यी संख्या अभावी पालिका शाळेतील शिक्षक अतिरिक्त झाले असुन त्यांना हिंदी माध्यमाच्या शाळेत सामावुन घेण्यात आले आहे.

Web Title: The last house in Sindhi medium schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.