गावपाड्यांच्या स्वच्छतेसाठी गावकऱ्यांना जि.प.चे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:44 AM2021-09-25T04:44:18+5:302021-09-25T04:44:18+5:30

ठाणे : जिल्ह्यातील सर्व गावखेडी, पाड्यांची रोज साफसफाई करून स्वच्छता कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेसह ...

Lessons of ZP to the villagers for the cleanliness of the villages | गावपाड्यांच्या स्वच्छतेसाठी गावकऱ्यांना जि.प.चे धडे

गावपाड्यांच्या स्वच्छतेसाठी गावकऱ्यांना जि.प.चे धडे

Next

ठाणे : जिल्ह्यातील सर्व गावखेडी, पाड्यांची रोज साफसफाई करून स्वच्छता कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेसह (जि.प.) पंचायत समिती, ग्रामपंचायत आदींच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना व स्थानिक गावकरी, पदाधिकाऱ्यांना साफसफाईचे ऑनलाइन धडे देणारी कार्यशाळा शुक्रवारी दुपारी पार पडली. या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सखोल मार्गदर्शन केले.

केंद्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी स्वच्छतेच्या सर्व निकषांची पूर्तता करून घेण्यासाठी गावकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आदींची भूमिका महत्त्वाची आहे. एकमेकांच्या साथीनेच ‘आपले गाव स्वच्छ-सुंदर’ बनवून या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आज्त. आजघडीला गावोगाव स्वच्छतेच्या चळवळ स्वरूपात काम सुरू असले तरीदेखील त्या कामांवर समाधानी न राहता शाश्वत आणि व्यापकपणे काम करण्याची सूचनाही दांगडे यांनी या कार्यशाळेत केली. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ च्या संपूर्ण सर्वेक्षणाची माहिती दिली.

...........

--

Web Title: Lessons of ZP to the villagers for the cleanliness of the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.