कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा यशस्वी सामना केला आहे. तिसरी लाट आली तरी तिचा सर्वांच्या सहकार्याने सामना करू, असा विश्वास कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार डॉ. पाटील यांनी कोविड टास्क फोर्सच्या डॉक्टरांचे चर्चासत्र मंगळवारी स्थायी समितीच्या दालनात आयोजित केले होते. यावेळी डॉ. पाटील यांनी उपरोक्त विश्वास व्यक्त केला. या चर्चासत्रात महापालिकेच्या रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्रात काम करणारे वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये काम करणारे डॉक्टर उपस्थित होते. कोविडची तिसरी लाट आली तर काय काळजी घ्यावी, कोविडची सौम्य लक्षणे दिसल्यास काय उपाययोजना कराव्यात, याबाबत टास्क फोर्सचे डॉ. अमित सिंग, डॉ. हिमांशु ठक्कर, डॉ. श्रेयस गोडबोले यांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले.
कोविड झालेले अनेक रुग्ण हे सहव्याधी असलेले असतात. सदर रुग्णांवर कशा प्रकारे उपचार करावेत याबाबत टास्क फोर्सचे डॉ. राजेंद्र केसरवानी, डॉ. अमित बोटकोंडले यांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले.
फोटो-कल्याण-केडीएमसी
--------------------
वाचली