शरद पवारांना पाठवली ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे, राम मंदिरावरील टीकेला भाजपा युवा मोर्चाचे प्रतिउत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 03:41 PM2020-07-23T15:41:50+5:302020-07-23T15:42:19+5:30

युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरातून जय श्रीराम लिहिलेली 10 लाख पत्रे त्यांना पाठविली जाणार आहेत.

Letters with 'Jai Shriram' sent to Sharad Pawar, BJP Yuva Morcha's reply to the criticism on Ram Mandir | शरद पवारांना पाठवली ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे, राम मंदिरावरील टीकेला भाजपा युवा मोर्चाचे प्रतिउत्तर

शरद पवारांना पाठवली ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे, राम मंदिरावरील टीकेला भाजपा युवा मोर्चाचे प्रतिउत्तर

Next

कल्याण : राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपा युवा मोर्चाने प्रतिउत्तर दिले आहे. युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरातून जय श्रीराम लिहिलेली 10 लाख पत्रे त्यांना पाठविली जाणार आहेत. या पत्र पाठविण्याच्या आंदोलनास कल्याणमधून आज सुरुवात झाली आहे.

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव निखिल चव्हाण यांनी सांगितले की, शरद पवार जुने जाणते नेते आहेत. त्यांनी अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही हे आम्हालाही माहीत आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी आयोध्येमध्ये रामजन्मभूमी मंदिराचा शिलान्यास होत आहे. या चांगल्या कार्यक्रमात त्यांना सहभागी व्हायचे नसेल तर त्यांनी होऊ नये. हा त्यांचा प्रश्न आहे. 

मात्र, चांगल्या कामात मिठाचा खडा टाकू नये असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज्य भरातून 10 लाख पत्रे पाठविली जाणार आहेत. त्याची सुरुवात कल्याणमधून आज करण्यात आली. कल्याणमधून आज 4 हजार पत्रे शरद पवार यांच्या सिलव्हर ओक या घरी पाठविली आहेत. कल्याणमधून किमान 20 हजार पत्रे पाठविली जाणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे.
 

Web Title: Letters with 'Jai Shriram' sent to Sharad Pawar, BJP Yuva Morcha's reply to the criticism on Ram Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.