भार्इंदर : पालिका निवडणुकीसाठी मनसेने सर्वप्रथम २५ उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर केली. मनसेने यंदाच्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ८, १०, ११, १२, १३, १४, १७, १८ व २१ मधून उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केली आहे. या प्रभागांत मनसेला पोषक वातावरण असल्यानेच लढण्याचा निर्णय घेतल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्याही निवडणुकीत मराठी मुद्दा कायम राहणार असला तरी शहराच्या विकासाचा मुद्दासुद्धा निवडणुकीत प्राधान्यक्रमाने घेण्यात येणार आहे.पक्षात फारसे इच्छुक नाराजांचा प्रश्नच उद््भवलेला नाही. त्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी पक्षाला वेगळा मुहूर्त शोधावा लागला नाही. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार सोमवारी २५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आणखी १० ते १५ उमेदवारांची यादीही जाहीर केली जाणार असल्याचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सांगितले. मनसेची भिस्त अन्य पक्षातील बंडखोरांवर आहे.शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने बंडखोरी टाळण्यासाठी अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.
मनसेच्या २५ उमेदवारांची यादी सर्वप्रथम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:41 AM