जान्हवी मोर्ये कल्याण : देशात घडणाºया घटनांवर केवळ साहित्यिकांनीच भाष्य करावे असे नाही, तर शेतकºयांनी आणि समाजातील अन्य घटकांनीही बोलले पाहिजे. पण एखादा लेखक-साहित्यिक बोलला तर त्यांना गोळ््या घातल्या जातात, अशी परिस्थिती सध्या आहे, असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी रविवारी ‘लोकमत’कडे मांडले.जात पाळणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार असल्याचे समजणे हा आपला ढोंगीपणा आहे. ज्या देशात जात, धर्म आणि देव यांचे अवास्तव अवडंबर माजवले जाते, तो समाज आणइ या विषयावरील वाद मनोरुग्णतेचे लक्षण असते, अशी टीकाही त्यांनी मेधा खोले यांच्या सोवळ््याच्या प्रकरणावरून उठलेल्या वादावर केली. खोलेंविरोधात तक्रार करणारे स्वत: किती विज्ञाननिष्ठ आहेत, असा सवाल त्यांनी केला. खोले आणि त्यांच्यावरील टीकाकारांनी विज्ञाननिष्ठ होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. पृथ्वीसारख्या चार ग्रहांचा शोध लागला. त्यावर गेल्या दोन वर्षात किती चर्चा झाली, असा सवाल करून नेपच्यून ग्रहावर पंतप्रधानांनी अद्याप टिष्ट्वट का केले नाही, असा तिरकस सवाल केला. आपण भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान व्यक्त करतो. पण संस्कृती म्हणून आपल्याकडे काय शिल्लक आहे? सगळ््या पृथ्वीवरील संस्कृतीची सरमिसळ होत नवी संस्कृती तयार होत असते. तसे ४० लाख वर्षांपासून होत आहे. सर्वच संस्कृतींवर तिचा प्रभाव पडतो. त्यामुळे आपली संस्कृती, आपले साहित्य, आमचे मराठी साहित्य असा वृथा अभिमान बाळगून त्याबद्दल गर्वाने काही सांगत असू तर त्यातून आपला मूर्खपणाच प्रतीत होतो. साºया गोष्टी जगभरातून राबवून आपल्याकडे आल्या असल्याने हा एक प्रकारचा संकर आहे. त्यातील कशावरही हक्क सांगत आमचे म्हणून त्याचा गर्व बाळगण्याचे कारण नाही, असा टोला त्यांनी संस्कतीचे गोडवे गाणाºयांना लगावला.साहित्यातील सारेच पॅटर्न कुठून ना कुठून चोरलेले!खोले यांच्या सोवळ््याच्या प्रकरणावर लिहावे, असा साहित्याचा फॉर्मच अद्याप आपल्याकडे नाही. साहित्यचे सगळे पॅटर्न आपण चोरलेले आहे. कविता बाहेरुन आलेली आहे. अभंग आणि ओव्या या सुफी व अरबांकडून आलेल्या आहेत, असा दाखला त्यांनी दिला.ाहाराष्ट्रातील पहिली लावणी ही ४०० वर्षापूर्वी दखणी भाषेत मुस्लिम कवीने लिहिली. पण साहित्याचा इतिहासही सोयीस्कर पद्धतीने लिहिणारे ‘आपले कोण’ हे जाणून घेऊन त्यांचीच नावे इतिहासात ठासतात. तिथे दुसºया धर्मीयाने लिहिलेल्या साहित्याची दखल कशी घेणार, असा सवाल करत खान यांनी साहित्याच्या प्रांतातील जातीवादावर बोट ठेवले.ज्ञानेश्वरांना आपण आद्य कवी मानतो. त्यांनी कोणाकडे शिक्षण घेतले? त्यांच्या आधीही आणि त्यांच्या समकालात कोणी तरी कवी असतीलच ना? पण त्यांचा विचार आपण करीत नाही. त्यामुळे आद्य असे काही नसते. गौतम बुद्ध हे पहिले बुद्ध नव्हते. त्याआधीही आणखी कोणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिनी-अरबांनी आपल्याला लेखन शिकवले. जे काही आहे ‘ते इधर उधरसे उठाया हुआ है’ अशा शब्दांत त्यांनी साहित्यिकांना बोचरे चिमटे काढले.
साहित्यिक बोलला की गोळ्या घालतात! राजन खान यांची स्पष्टोक्ती, सद्य:स्थितीवर केले मार्मिक भाष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 6:40 AM