लांबच्या मार्गावर पूर्वीच्याच ३२ आसनी लोकल धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 05:49 PM2018-02-23T17:49:19+5:302018-02-23T17:49:19+5:30

मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे पुर्वी ज्या आसनांवर ३२ प्रवाशी बसुन प्रवास करायचे आत्ता त्याच आसनांवर काही लोकलमध्ये केवळ १४ च प्रवाशी बसुन प्रवास करत आहेत. त्याची मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी गंभीर दखल घेत, लांबच्या मार्गावर कमी आसनाच्या लोकल न सोडण्याचे आदेश दिले आहेत.

On long distances, the first 32 local trains will run on the same line | लांबच्या मार्गावर पूर्वीच्याच ३२ आसनी लोकल धावणार

कमी आसनाच्या लोकल न सोडण्याचे आदेश

Next
ठळक मुद्दे डिआरएम एस.के.जैन यांचा प्रवासी संघटनेला दिलासाकमी आसनाच्या लोकल शॉर्टरुटवर

डोंबिवली: मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे पुर्वी ज्या आसनांवर ३२ प्रवाशी बसुन प्रवास करायचे आत्ता त्याच आसनांवर काही लोकलमध्ये केवळ १४ च प्रवाशी बसुन प्रवास करत आहेत. त्याची मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी गंभीर दखल घेत, लांबच्या मार्गावर कमी आसनाच्या लोकल न सोडण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात उपनगरिय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या प्रतिनिधींनी जैन यांची गुरुवारी मुंबई येथे अ‍ॅनेक्स इमारतीत डिआरएमच्या दालनात भेट घेतली. त्या भेटीमध्ये जैन यांनी प्रवाशांची अपेक्षा समजावून घेत, त्या मागणीत तथ्य असल्याचे म्हंटले. दोन तासांहून अधिक वेळ लागणा-या कसारा, कर्जतच्या प्रवाशांना कमी आसनाच्या लोकल सुविधा काही उपयोगाची नाही, त्यात प्रवाशांची अडचणच होते. त्यामुळे शॉर्ट रुटच्या लोकलमध्ये ही सुविधा द्यावी, हे बदल तातडीने करावे असे आदेश त्यांनी परिचालन विभागाच्या अधिका-यांना दिले.
सध्याच्या कमी आसन असलेल्या काही लोकलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन लांब पल्याच्या उपनगरीय लोकलच्या प्रवाशांना सुरुवातीच्या स्थानकापासुनच ठाणे कल्याण पुढील रेल्वे स्थानकापर्यंत उभे राहुन प्रवास करावा लागतोे. आसनावर बसलेल्या कुणी सहप्रवासीही लांबचा प्रवास असल्याने सहप्रवाशांना बसण्यासाठी जागा देत नसल्याचा अनुभव येत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. सीएसएमटी येथून निघालेल्या लोकलमध्ये आभावानेच प्रवासी घाटकोपर,ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान सहप्रवाशांना बसण्यासाठी जागा देतात. अन्यथा प्रवाशांना अडीच ते तीन तास ताटकळत प्रवास करावा लागत असल्याची खंत कर्जत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रभाकर गंगावणे यांनी लोकमतकडे व्यक्त केली होती.

 

Web Title: On long distances, the first 32 local trains will run on the same line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.