महावितरण : १,५०० कर्मचाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 01:02 AM2020-03-20T01:02:25+5:302020-03-20T01:03:10+5:30
नियंत्रण अधिकारी व कक्ष अधिकारी वगळता इतर सर्व कर्मचा-यांसाठी ३१ मार्चपर्यंत घरून काम करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणने निम्या कर्मचाऱ्यांना गुरुवारपासून ‘वर्क फ्रॉम होम’ (घरून काम) करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार कल्याण परिमंडळातील एकूण तीन हजार २५० कर्मचा-यांपैकी दीड हजार कर्मचा-यांना आलटून पालटून या सेवेचा लाभ घेता
येणार आहे.
नियंत्रण अधिकारी व कक्ष अधिकारी वगळता इतर सर्व कर्मचा-यांसाठी ३१ मार्चपर्यंत घरून काम करण्याची सुविधा देण्यात आली आहे. उपलब्ध कर्मचा-यांपैकी अर्ध्या-अर्ध्या कर्मचा-यांचे दोन गट तयार केले आहेत. ते आलटून-पालटून एक दिवसाआड कार्यालयात व घरी बसून फोन, ई-मेलद्वारे परस्पर समन्वयाने काम करतील. कोरोनाचा प्रादुर्भाव व गर्दी टाळण्यासाठी घरी बसून काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांनी घरातच बसून काम करावे, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.
बिलवसुलीसाठी मोबाइलद्वारे संपर्क
वीजबिल वसुलीची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयांनी घरी बसून काम करण्याच्या दिवशी त्यांना दिलेल्या यादीतील किमान २०० ग्राहकांना मोबाइलवर संपर्क करावयाचा आहे. संबंधित ग्राहकांना आॅनलाइन वीजबिल भरणा करण्याची कार्यपद्धती समजून सांगून ही सेवा वापरण्यास ग्राहकांना प्रोत्साहित करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले आहे.
मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड व पथकाने हे नियोजन केल्याचे महावितरणच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यानुसार, प्रशासकीय व कार्यालयीन कामकाजास बाधा होऊ न देता कर्मचाºयांनी घरून काम करून घेण्याचे नियोजन केले आहे.