टोकावडे - राष्ट्रीय महामार्ग ६१ कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाट ते टोकावडे या ३० ते ३५ किमीच्या रस्त्यामध्ये दरोरोज कुठेना कुठे अपघात घडतच असतो, हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस केंद्र माळशेज घाट हे वारंवार त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. पण काही ठिकाणी वाहनचालक वेगवान वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देतात. माळशेज घाट ये-जा करत आसताना अनेक ठिकाणी गो-फाॅर स्लो असे बोर्ड लावलेले दिसतात, मात्र वाहनचालक याकडे दुर्लक्ष करत वाहने वेगवान चालवतात.माळशेज घाटामध्ये दोन महिन्यांपासून घाटातील दोन धोकादायक वळणांवर सिमेंट काॅंक्रिटच्या रस्त्याचे काम सुरू असून ते काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी एकेरी वाहतूक दरोरोज सुरू असते. त्यामुळे या परिसरात अपघात होण्याची संभावना नाकारता येत नाही. त्यातच माहामार्ग पोलीस यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. ते वाहनचालकांना विशिष्ट मार्गदर्शन करत आहेत. तसेच वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार वाहनचालकांवर नजर ठेवून आहे. त्यामुळे अपघात कमी होणार असल्याचे दिसत आहे. धिम्या गतीने सुरू असल्याने सिमेंट काॅंक्रिट रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल वाहनचालक विचारत आहेत. आम्ही या माळशेज घाटमार्गे दररोज मुंबई येथे भाजीपाला घेऊन जात असतो. मात्र या घाटात दाेन महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे वाहतूक काही वेळ विस्कळीत होते. ते काम लवकर पूर्ण व्हावे, असे वाहनचालक रामचंद्र वायाल यांनी सांगितले. ट्रकला अपघातटोकावडे : माळशेज घाटात सिमेंट ट्रक उलटून चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माळशेज घाटातील सावणे गावच्या वरच्या वळणावर सिमेंट रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तेथे सिमेंट मिक्सर खाली करून जात असताना मोरोशी येथील वळणावर उलटल्याने चालक किरकोळ जखमी झाला आहे. रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत दररोज अनेक वाहनचालकांना वाहन चालवताना वळणावर सावकाश जावे, असे आवाहन करत केले जाते. मात्र, वाहनचालक सूचनांचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अपघात घडत आहेत.- किरण मतकर, सहायक पाेलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस, माळशेज
माळशेज घाटात अपघातांची मालिका, अपूर्ण रस्ता, बेशिस्त ठरते कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 1:31 AM