----------------
मोबाइल चोरला
डोंबिवली : पूर्वेतील पाथर्ली रोड, गोग्रासवाडीतील तिरुपती दर्शन येथे राहणारी किंजल शाह ही रविवारी सायंकाळी ७ वाजता टिळकनगर येथून घरी परतत होती. ती राहत असलेल्या इमारतीच्या ‘ए’ विंग समोर आली असताना पाठीमागून आलेल्या चोरट्याने तिच्या हातातील मोबाइल हिसकावला आणि पलायन केले. याप्रकरणी तिच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
---------------------------------
आज लस नाही
कल्याण : सरकारकडून लसीचा साठा उपलब्ध होऊ न शकल्याने मंगळवारी केडीएमसी हद्दीतील मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा बंद राहील, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
------------------------------------
केडीएमसी हद्दीत कोरोनाचे २४ रुग्ण
कल्याण : केडीएमसी हद्दीत सोमवारी कोरोनाचे नवीन २४ रुग्ण आढळून आले. उपचाराअंती ५५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, सध्या ५२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत मनपा हद्दीत एक लाख ३६ हजार ९९० इतके रुग्ण बरे झाले आहेत.
------------------------------------------
आरोग्य जनजागृतीसाठी दौड
डोंबिवली : रनर्स क्लॅन ग्रुपने रविवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत स्वतंत्रता दौडचे आयोजन करून आरोग्याविषयक जनजागृती केली. पश्चिमेतील भागशाळा मैदान येथून दौडला सुरुवात झाली, तर पूर्वेतील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकाला अभिवादन आणि ध्वजवंदन करून कामगार नाका येथे दौडची सांगता झाली. त्यात लहानांपासून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या दौडचे आयोजन ईश्वर पाटील यांनी केले, तर रनर्स क्लॅन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण गुंडप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वत:चे आरोग्य उत्तम राखण्यासाठी दररोज एक तास स्वत:ला वेळ द्या आणि धावण्याच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, असा संदेश या दौडमधून देण्यात आला.
फोटो मेलवर पाठवला आहे
---------------