मोनो, मेट्रो प्रकल्पांचा सजीवसृष्टीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:33 AM2017-07-31T00:33:20+5:302017-07-31T00:33:23+5:30

गेल्या काही वर्षांत औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होतो आहे, मात्र हा विकास प्राणघातक असून, येत्या ५ वर्षांत औद्योगिकीकरण कोसळू लागेल आणि मानवसृष्टीला धोका निर्माण होईल.

maonao-maetarao-parakalapaancaa-sajaivasarsatailaa-dhaokaa | मोनो, मेट्रो प्रकल्पांचा सजीवसृष्टीला धोका

मोनो, मेट्रो प्रकल्पांचा सजीवसृष्टीला धोका

Next

ठाणे : गेल्या काही वर्षांत औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होतो आहे, मात्र हा विकास प्राणघातक असून, येत्या ५ वर्षांत औद्योगिकीकरण कोसळू लागेल आणि मानवसृष्टीला धोका निर्माण होईल. ही सृष्टी वाचवायची असेल तर मोनो, मेट्रो आणि तत्सम प्रकल्प तत्क ाळ थांबवले पाहिजे, असे मत पर्यावरणतज्ज्ञ अ‍ॅड. गिरीश राऊत यांनी व्यक्त केले.
रौद्र प्रतिष्ठानच्यावतीने ‘वाढते तापमान आणि शेतकºयांच्या आत्महत्या’ या विषयावर राऊत यांचे व्याख्यान भंडारी समाज हॉल येथे शनिवारी आयोजिण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 
गेल्या वर्षीच्या जूनपासून यावर्षीच्या जूनपर्यंत एका वर्षात पृथ्वीच्या सरासरी तापमानात ०.२४ अंश से. एवढी वाढ झाली आहे. वातावरणातील हा बदल अत्यंत धोकादायक असल्याचे युनोची जागतिक हवामान संघटना, अमेरिकेच्या नासा आणि राष्टÑीय महासागर आणि वातावरण प्रशासन संस्था या तीनही संघटनांनी जाहीर केले आहे. ही तापमानवाढ अशीच राहिल्यास विषुववृत्तापासून ध्रुवांपर्यंतच्या देशात सजीवांना राहणे अशक्य होईल, अशी माहिती राऊत यांनी दिली. 
एकदा वातावरणात गेलेला कार्बन सुमारे एक हजार वर्षे वातावरणात टिकतो व तापमान वाढवतो. भारतात तर साधारणपणे वीज उत्पादनासाठी रोज सुमारे पंधरा लाख टन कोळसा जाळला जातो. या सगळ्या प्रक्रियेत लाखो टन विषारी वायू वातावरणात सोडले जातात. कार्बन उत्सर्जनामुळे निसर्गचक्र बिघडू लागले आहे आणि शेतीवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. शेतीतून योग्य उत्पादन आणि उत्पन्न मिळत नसल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत, ही मोठी खंत आहे. माणूस भरमसाठी शिक्षण घेऊन संशोधनाच्या मागे लागला आहे. मात्र पृथ्वीला बुद्धिमत्तेची गरज नाही. तिला स्वत:चा  इंटेलिजन्स आहे. आपण फक्त साधेपणा आणि शहाणपणा दाखविण्याची आणि जगण्यासाठी नैसर्गिक शेती करण्याची गरज आहे, असे मतही राऊत यांनी व्यक्त केले. 
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा आलेख स्लाईड शोद्वारे दाखविला. यावेळी राजन राजे यांच्या हस्ते राऊत दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. 

Web Title: maonao-maetarao-parakalapaancaa-sajaivasarsatailaa-dhaokaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.