बोलबच्चन गँग : ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 01:09 AM2019-09-05T01:09:20+5:302019-09-05T01:09:31+5:30

बोलबच्चन गँग : १२ तोळे सोन्याचे दागिने केले हस्तगत

 Mharukhi arrested for robbing senior citizens | बोलबच्चन गँग : ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक

बोलबच्चन गँग : ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक

Next

ठाणे : बोलण्यात गुंतवून ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाºया ‘बोल बच्चन गँग’च्या टोळीचा म्होरक्या राजू शेट्टी याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून १२ तोळे वजनाचे तीन लाख ९४ हजार ८५० रुपये किमतीचे दागिने हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वेगवेगळया प्रकारची बतावणी करून वयोवृद्ध महिला तसेच पुरुषांना अंगावरचे दागिने काढायला भाग पाडून नंतर ते त्यांच्याकडे दिल्याचा बहाणा करून धूम ठोकणाºया या टोळीने ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने अशा प्रकारचे गुन्हे करणाºया रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा अभ्यास करून त्यांचा शोध घेण्याची मोहीम ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने सुरू केली होती. अशाच एका टोळीचा म्होरक्या राजू शेट्टी याची माहिती मिळाल्यानंतर त्याला मुंबईतील अ‍ॅन्टॉप हिल भागातून २३ आॅगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अटक केली. त्याने ठाण्यातील नौपाडा, खोपट, रेल्वे स्टेशन, प्रजापिता ब्रम्हाकुमारी चौक अशा अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना भुलथापा देऊन त्यांच्याकडील दागिने, रोकड आणि वस्तू लुबाडल्याची कबुली दिली आहे.

ठाणे, मुंबईत या गँगचा धुमाकूळ
ठाणे आणि मुंबई परिसरात धुमाकूळ घालणाºया बोलबच्चन गँगचा तो म्होरक्या असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे यांच्यासह निरीक्षक रणवीर बयस, उपनिरीक्षक दतात्रेय सरक, हवालदार सुनील जाधव, आनंदा भिलारे, रवींद्र पाटील आणि राहुल पवार आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. त्याच्याकडून फसवणुकीचे आणखीही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title:  Mharukhi arrested for robbing senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.