ठाणे : चीनी उत्पादनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज रस्त्यावर उतरली. चीनी ब्रँडचे असलेल्या एका मोबाईलचे कापुरबावडी येथील शोरुमचे शटरच महाराष्ट्र सैनिकांनी डाउन केले. तसेच चायना कंपनीचे मोबाईल जाळून घोषणाबाजी केली. या घटनेनंतर परिसरातील सर्व चीनी उत्पादनांचे मोबाईल शोरुम दुकानदारांनी तात्काळ बंद केले.
चीनी सैनिकांनी भारतीय लष्करावर हल्ला केल्यानंतर देशवासियांच्या भावना अधिकच तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे शहराध्यक्ष किरण पाटील प्रभाग आणि अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्यासह महाराष्ट्र सैनिकांनी ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील कापुरबावडीचे हे मोबाइल शोरूम बंद पाडले. महाराष्ट्र सैनिकांनी या मोबाइलची होळी केली. आणि चीन सरकारविरोधात तुफान घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपशहराध्यक्ष दीपक जाधव, प्रमोद पाताडे, विभागध्यक्ष अनिल सूर्यवंशी, अक्षय मुकादम, हर्षल महाजन, उपविभाग अध्यक्ष अक्षय मोरे, कुणाल भोसले , नितीन पाटील, प्रसिद्धी माध्यम प्रमुख चेतन पांडव, सागर वर्तक, सुनील भोसले, रुपेश झांजे आदी उपस्थित होते.