चांगले रस्ते बांधले म्हणून मनसेने केले सार्वजनिक बांधकाम अधिका-यांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 08:51 PM2018-03-08T20:51:10+5:302018-03-08T20:51:10+5:30

डोंबिवलीतील पेंढरकर कॉलेज रोड व खंबाळपाडा रोडच्या दुरावस्थेबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून बोंब सुरू होती. गेल्या पावसाळी हंगामात तर सदर रस्त्याच्या दुरावस्थेने सीमा ओलांडली. एका तरूणाचा त्यात बळी सुध्दा गेला.

MNS appreciated public works officers for building good roads | चांगले रस्ते बांधले म्हणून मनसेने केले सार्वजनिक बांधकाम अधिका-यांचे कौतुक

चांगले रस्ते बांधले म्हणून मनसेने केले सार्वजनिक बांधकाम अधिका-यांचे कौतुक

Next

डोंबिवलीतील पेंढरकर कॉलेज रोड व खंबाळपाडा रोडच्या दुरावस्थेबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून बोंब सुरू होती. गेल्या पावसाळी हंगामात तर सदर रस्त्याच्या दुरावस्थेने सीमा ओलांडली. एका तरूणाचा त्यात बळी सुध्दा गेला. झोपलेल्या यंत्रणा खाड करून जाग्या झाल्या. वारंवार मनसेने पाठपूरावा केला. महापालीका,औद्योगिक महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक मनसेने घेतली, रस्ते तात्काळ सुधारण्याचे आश्वासन मिळाले...

आज 20 वर्षानंतर ठिगळं, ठिगळांचे थुकपट्हेटीचे काम न होता दोन्ही रस्ते अगदी चांगल्यारीत्या काम करून,  गटारापर्यंत सफाई करून पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ते चकाचक केले. हे मनसेचे जरी यश असले तरी रस्ता बांधणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुध्दा तेवढीच मेहनत व मन लावून चांगले काम करून देण्याच्या प्रयत्नांच्या यशाचे ते फळ आहे.  ह्याच चांगल्या कामाचे कौतुक म्हणुन सा.बांधकाम (pwd) चे अधिकारी जी.पी.डोमाळेसाहेब, उपअभियंता व पारळेसाहेब, शाखा अभियंता ह्यांचे अभिनंदन मनसेतर्फे करण्यात आले.  समस्त डोंबिवलीवासींयातर्फे धन्यवाद देण्यात आले तसेच सदर रस्ते पावसाळ्यात टिकून रहातील असे आश्वासन घेण्यात आले.

यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम,विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, उप जिल्हा प्रमुख सुदेश चुडनाईक, शहर संघटक प्राजक्त पोतदार,विद्यार्थि सेना डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, व शैलेंद्र सज्जे उपस्थित होते.

Web Title: MNS appreciated public works officers for building good roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.