नागरिकांना लुबाडणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेचा चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:54 AM2021-02-27T04:54:12+5:302021-02-27T04:54:12+5:30

कल्याण : पश्चिमेत रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या स्कायवॉकवर रात्रीच्या सुमारास नागरिकांना लुबाडणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेने गुरुवारी रात्री चांगलाच चोप ...

MNS slaps third parties for robbing citizens | नागरिकांना लुबाडणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेचा चोप

नागरिकांना लुबाडणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेचा चोप

Next

कल्याण : पश्चिमेत रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या स्कायवॉकवर रात्रीच्या सुमारास नागरिकांना लुबाडणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेने गुरुवारी रात्री चांगलाच चोप देत महात्मा फुले चौक पोलिसांच्या हवाली केले.

स्कायवॉकवर तृतीयपंथीयांकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी कल्याण शहर मनसेकडे आल्या होत्या. स्कायवॉकवरून जाणाऱ्यांकडून जबरदस्ती पैसे लुबाडणे, पैसे न दिल्यास घाणेरड्या शिव्या देऊन मारहाण करणे आदी प्रकार तृतीयपंथीयांकडून सुरू होते. या तक्रारींची दखल घेत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रात्री थेट कल्याणच्या स्कायवॉकवर धडक देत तृतीयपंथीयांना चांगलीच अद्दल घडवली. संपूर्ण स्कायवॉक पिंजून काढत तेथे असणाऱ्या तृतीयपंथीयांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, महिला शहराध्यक्षा शीतल विखणकर, विभाग अध्यक्ष कपिल पवार, शहर सचिव अर्चना चिंदरकर (लाड), शहर संघटक चेतना रामचंद्रन, उपशहराध्यक्षा प्रज्ञा कांबळे, सुरेखा महाजन, उपविभाग रोहन अक्केवार, शाखाध्यक्ष सचिन सावंत व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.

----------------------

Web Title: MNS slaps third parties for robbing citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.