KDMC च्या ३७ व्या वर्धापनदिनी मनसेचं अनोखं आंदोलन; खड्ड्यांच्या निषेधार्थ कापला केक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:45 PM2020-10-01T17:45:26+5:302020-10-01T17:45:41+5:30

मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह सचिन कस्तूर, सागर जेधे आदी मनसे कार्यकत्र्यानी डोंबिवली पूव्रेतील टिळक चौका जवळ रस्त्यात केक कापून महापालिकेचा निषेध व्यक्त केला.

MNS unique agitation on the 37th anniversary of KDMC; Cut cake to protest against potholes | KDMC च्या ३७ व्या वर्धापनदिनी मनसेचं अनोखं आंदोलन; खड्ड्यांच्या निषेधार्थ कापला केक

KDMC च्या ३७ व्या वर्धापनदिनी मनसेचं अनोखं आंदोलन; खड्ड्यांच्या निषेधार्थ कापला केक

Next

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नसल्याच्या निषेधार्थ आज मनसेने महापालिकेच्या ३७ व्या वर्धापन दिनी खड्डय़ात केक कापून प्रशासनाचा निधेष व्यक्त केला. ही महापालिका कल्याण डोंबिवली महापालिका नसून खड्डय़ाण डोंबिवली महापालिका असल्याची टिका मनसेच्या वतीने आज करण्यात आली. आंदोलनापूर्वी मनसेचा कार्यकर्ता रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडीवरुन पडून जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटनाही घडली आहे.

मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह सचिन कस्तूर, सागर जेधे आदी मनसे कार्यकत्र्यानी डोंबिवली पूव्रेतील टिळक चौका जवळ रस्त्यात केक कापून महापालिकेचा निषेध व्यक्त केला. महापालिकेची प्रतिकृती असलेला केक यावेळी तयारक करण्यात आला होता. महापालिका हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले असून ते बुजविण्याची मागणी मनसेच्या वतीने गेल्या दीड महिन्यापासून प्रशासनाकडे केली जात आहे. त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. पावसाने उघडीक दिली नसल्याने खड्डे बुजविले जात नसल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जात होते. आत्ता पाऊसाने उघडीप दिली असली तरी खड्डे बुजविले जात नाहीत. महापालिकेचा आज ३७ वर्धापन दिन असला तरी त्यांच्या विकासाचा प्रवास हा उलटा आहे. तो प्रवास खड्डेमय रस्त्यातून आहे. त्यामुळे मनसेने हे आंदोलन केले असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे.

आंदोलनापूर्वी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर आंदोलनाच्या ठिकाणी दुचाकीवरुन येत असलेले मनसेचे कार्यकर्ते प्रशांत पोमेणकर हे खड्डा वाचवित असताना त्यांच्या समोरुन एक दुचाकी चालक आला. तोही खड्डा वाचवत होता. या प्रयत्नात पोमेणकर यांचा दुचाकीवरुन तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. या वेळी त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यांच्या पायाला झालेल्या जखमेवर डॉक्टरांनी दहा टाके टाकले आहेत. पायाला बॅण्डेज बांधून पोमेणकर हे आंदोलनात सहभागी झाले होते. डॉक्टरांनी त्याना किमान दहा दिवस विश्रंती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title: MNS unique agitation on the 37th anniversary of KDMC; Cut cake to protest against potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.