कल्याण शीळ वाहतूक कोंडीवर मनसेचे इच्छा तिथे मार्ग हा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 08:05 PM2020-10-28T20:05:19+5:302020-10-28T20:05:38+5:30

आठवडाभर हे वॉर्डन वाहतूक कोंडी सुरळित करण्याचे काम पार पाडणार आहे.

MNS wants to solve the traffic congestion on Kalyan Shil Road | कल्याण शीळ वाहतूक कोंडीवर मनसेचे इच्छा तिथे मार्ग हा उपाय

कल्याण शीळ वाहतूक कोंडीवर मनसेचे इच्छा तिथे मार्ग हा उपाय

Next

कल्याण-कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आजपासून मनसे वाहतूक सौजन्य सप्ताह सुरु केला आहे. इच्छा तिथे मार्ग असे या उपक्रमाला नाव दिले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मनसेच्या वतीने वाहतूक कोंडी सुरळित करण्यासाठी ३० वार्डन नेमले आहे. आठवडाभर हे वॉर्डन वाहतूक कोंडी सुरळित करण्याचे काम पार पाडणार आहे.


कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने मनसेचे आमदार राजू पाटील हे चार दिवसापूर्वी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी वाहतूक कोंडी प्रकरणी वाहतूक पोलिसांना फैलावर घेतले होते. त्यानंतर मनसेचे राजेश कदम यांनी या रस्त्यावरुन अवजड वाहने सोडली जात असल्याने वाहतूक कोंडी होते या पुराव्या दाखल एक व्हीडीओ तयार करुन तो सोशल मिडियावर टाकला होता. वाहतूक पोलिसांकडे मनुष्यबळ कमी आहे. वॉर्डन वाढवून देण्याची मागणी केली आहे. ते वाढवून दिले जात नसल्याचा खुलासा वाहतूक पोलिस अधिका:याने आमदार  पाटील यांच्याकडे केला होता. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अखेरीस मनसेने पुढाकार घेतला आहे. मनसेने आजपासून इच्छा तिथे मार्ग या घोषवाक्याच्या आधारे वाहतूक सौजन्य सप्ताह सुरु केला आहे. या सप्ताहात 3क् वार्डन वाहतूक कोंडी सुरळित करणार आहे. या वाहतूक सप्ताहाचे व्यवस्थापन करणारे मनसेचे पदाधिकारी चिन्मय मडके यांनी सांगितले की, ३० वार्डन स्वयंस्फूर्त रित्या वाहतूक कोंडी दूर करण्याचे काम करणार आहे.

शीळ फाटा ते पलाला दरम्यान हे 3क् वॉर्डन सकाळी व संध्याकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी दूर करण्याचे काम करतील. त्यातून वाहतूक कोंडी सुरळित होऊन प्रवासी व वाहन चालकांना इच्छीत स्थळी कमी वेळेत पोहचता येईल. मनसेने या उपक्रमाचे नाव इच्छा तिथे मार्ग असे ठेवून हॅशटँग केले आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याची सत्ताधा:यांना इच्छा नाही. त्यामुळेच त्यांनी इच्छा तिथे मार्ग असे सांगून एक प्रकारे सत्ताधा:यांवर निशाणा साधला आहे. मनसेच्या या उपक्रमाचे वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवासी व वाहन चालकांकडून कौतूक केले जात आहे.

Web Title: MNS wants to solve the traffic congestion on Kalyan Shil Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.