लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दहावर धर्मेद्रकुमार परिच्छा (४८, रा. नवी मुंबई) यांचा मोबाईल गहाळ झाला होता. तो महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान धीरज जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी तो रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) च्या मदतीने धर्मेद्रकुमार यांच्याकडे सुपूर्द केला.ठाणे रेल्वे स्थानकामध्ये रविवारी दुपारी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान जाधव यांना हा मोबाईल फलाट क्रमांक दहावर पडलेला आढळला. त्यांनी तो तातडीने रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यात जमा केला. त्यानंतर त्याच मोबाईलवर धर्मेंद्रकुमार यांनी फोन केला. तो आपला मोबाईल असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना या पोलीस ठाण्यात बोलवून पोलीस उपनिरीक्षक सोनाली मलैया यांनी त्यांची ओळख पटवून त्यांच्याकडे तो मोबाईल सुपूर्द केला. आपल्याला हा मोबाईल सुखरुप मिळाल्याबद्दल धर्मेद्रकुमार यांनी महाराष्ट्र सुरक्षा दलासह आरपीएफचे आभार मानले आहेत.
प्रवासी तरुणाचा मोबाईल सुरक्षा दलाच्या जवानामुळे पुन्हा सुखरुप मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 11:18 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दहावर धर्मेद्रकुमार परिच्छा (४८, रा. नवी मुंबई) यांचा मोबाईल ...
ठळक मुद्देठाणे आरपीएफने केले सहकार्य