भाईंदर - भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असताना स्थानिक पोलिसांना मात्र मोबईल अथवा चोर सापडत नसल्याने स्थानिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा चो-यांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.भार्इंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाजारांसह शाळेचा परिसर प्रचंड गर्दीचा ठरत असल्याने त्या गर्दीचा फायदा चोर घेत असतात. पोलिस ठाण्यालगतच असलेल्या नाझरेथ शाळा व समोरील भाजी बाजारात लोकांची नेहमीच मोठी गर्दी असते. त्याचा फायदा घेत चोर बेसावध लोकांच्या खिशासह वस्तुंवर डल्ला मारतात. यात मोबाईल चोरींचे प्रमाण जास्त असुन त्यांच्या तक्रारीवर मात्र पोलिस ठाण्यांत तक्रार घेण्याव्यतिरीक्त कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याची आरोप पिडीतांकडुन केला जात आहे. सध्या पोलिस ठाण्यांत आॅनलाईन तक्रार केली जाते. त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यातील संबंधित कर्मचारी आपल्या सोईनुसार मोबाईलचा ईएमईआय क्रमांक ट्रेसिंगसाठी आपल्या यंत्रावर टाकतात. दरम्यान मोबाईल चोर, चोरीचा मोबाईल इतर क्षेत्रात विकुन दुसऱ्या चोरीच्या मागे लागतो. त्यातच सध्या कित्येक मोबाईल धारकांनी विमा काढल्याने ते चोरी झालेल्या मोबाईलच्या शोधासाठी पोलिसांकडे पाठपुरावा करीत नसल्याचे दिसुन आले आहे. परिणामी पोलिसांना चोर अथवा मोबाईल सापडत नसल्याचे पिडीतांकडुन सांगण्यात येते. सोमवारी देखील पोलिस ठाण्यासमोरील भाजी बाजारात राजू काळे यांचा सॅमसंग ए८आय हा मोबाईल चोरीला गेला असताना त्याचा ईएमईआय क्रमांक ट्रेसिंगला टाकण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने सुरुवातीला टाळाटाळ करुन अखेर वरीष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना चारवेळा पोलिस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागल्याचे त्यांनी सांगितले.२०१५ मध्ये चोरीला गेलेल्या सॅमसंग नोट २ मोबईलची तक्रार पोलिसांत केल्यानंतरही अद्याप मोबाईल अथवा चोर पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे चोरांना पोलिसांच्या तपासाची माहिती असल्यानेच असे प्रकार वारंवार घडत आहेत.- स्थानिक रहिवासी प्रकाश नागणेचोरीला गेलेल्या मोबाईलचा ईएमईआय क्रमांक साधारणत: चार ते पाच दिवसांनी ट्रेसिंगसाठी टाकला जातो. लगेचच तो चालू होण्याची शक्यता कमी असल्याने तो त्वरीत ट्रेसिंगसाठी टाकला जात नाही. तरी देखील याची तक्रार कोणाकडेही केल्यास मला फरक पडत नाही.- भार्इंदर पोलिस ठाण्यातील कर्मचारी उथळेमोबाईल सांभाळताना घाई केली जात नाही तेवढी पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याच्या शोधासाठी घाई केली जाते. संबंधित कर्मचाय््रााला मोबाईलचा ईएमईआय क्रमांक ट्रेसिंगसाठी टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा शोध घेण्याची जबाबदारी माझी राहिल.- पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे
भार्इंदरमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 5:35 PM