केवळ शंभर रुपयांत साकारली आरास, सजावटीची रक्कम देणार पुरग्रस्तांना नाईक कुटुंबियांचा निर्धार

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 4, 2019 04:48 PM2019-09-04T16:48:32+5:302019-09-05T15:23:32+5:30

ठाण्यातील नाईक कुटुंबियांनी केवळ १०० रुपयांत घरगुती गणेशोत्सवासाठी आरास करुन सजावटीची रक्कम पुरग्रस्तांना देण्याचा निर्धार केला आहे.

 Naik families are determined to provide decorative money for only a hundred rupees. | केवळ शंभर रुपयांत साकारली आरास, सजावटीची रक्कम देणार पुरग्रस्तांना नाईक कुटुंबियांचा निर्धार

केवळ शंभर रुपयांत साकारली आरास, सजावटीची रक्कम देणार पुरग्रस्तांना नाईक कुटुंबियांचा निर्धार

Next
ठळक मुद्देकेवळ शंभर रुपयांत साकारली आराससजावटीची रक्कम देणार पुरग्रस्तांना इकोफ्रेण्डली सजावटीबरोबर इकोफ्रेण्डली गणेश मुतीर्ची स्थापना

प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : केवळ १०० रुपयांत घरगुती गणेशोत्सवासाठी आरास करुन सजावटीचा खर्च पुरग्रस्तांना देण्याचा निश्चय ठाण्यातील नाईक कुटुंबियांनी केला आहे. इकोफ्रेण्डली सजावटीबरोबर इकोफ्रेण्डली गणेश मुतीर्ची स्थापना या कुटुंबियांनी केली आहे.
              सोमवारपासून गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक संदेश देण्यावर भर दिला आहे. गेल्या काही वर्षांत घरगुती गणेशोत्सवातही सामाजिक संदेश देण्याचा पायंडा घातला आहे. अलिकडे घरगुती गणेशोत्सवातही इकोफ्रेण्डली सजावट करण्याकडे भक्तांचा कल असतो. ठाण्यातील लोकमान्यनगर येथील नाकोडा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नाईक कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक वेगळाच संकल्प केला आहे. दरवर्षी सजावटीसाठी तीन ते चार हजार रुपये खर्च करणाºया नाईक कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात हा खर्च वाचवून तो सांगली - कोल्हापूर ़येतील पुरग्रस्तांना देण्याचा निश्चय केला आहे. यावेळेस त्यांनी फक्त १०० रुपये खर्च करुन ही अभिनव आरास केली आहे. त्यांनी पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ््यांचा आणि पुठ्ठ्यांची आरास या गणेशोत्सवात केली आहे. सात वर्षांच्या देवश्री नाईक हिने आपल्या शाळेत अशाच प्रकारची आरास पाहिली होती आणि आपल्या घरात बाप्पासाठी पत्रावळीची आरास करुया अशी सूचना तिने आपल्या कुटुंबाकडे मांडल्यावर त्या सर्वांनी ही उचलून धरली. देवश्री हिच्यासह सुराग नाईक, सौरभ नाईक, समृद्धी नाईक यांनी दोन दिवसांत पत्रावळ््यांची ही आरास साकारली. सजावटीची रक्कम आम्ही संस्थेच्या माध्यमातून पुरग्रस्तांना देणार आहोत असे सुराग नाईक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यंदाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे त्यांच्या परिसरातील रहिवाशांकडून कौतुक होत आहे. दरवर्षी अशाच प्रकारचा सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प नाईक कुटुंबियांनी केला आहे.
 

Web Title:  Naik families are determined to provide decorative money for only a hundred rupees.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.