ठाणे : दसरा मेळाव्यात प्रचंड लोक येतील लोकांना उत्सुकता आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुत्वांचे विचार या मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी कसे ऐकायला मिळतील, शिवसेनेची उत्सुकता लोकांची उत्सुकता नक्कीच असेल बीकेसी वरतीच हिंदुत्वाचे विचार ऐकायला मिळतील शिवाजी पार्कवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विचार ऐकायला मिळतील ही मोठी तफावत आहे. शिवाजी पार्कवरती हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी बाळासाहेबांचे एक मैदान एक विचार एक नेता एक झेंडा अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र यंदा एक वेगळी विसंगती असेल असेल असे मत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केले. सोमवारी रात्रि उशिरा कदम यानी देखील टेभी नाका देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहून दर्शन घेतले.
देवीचे दर्शन घेतलं समाधान झालं एवढेच मागणं केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आई चांगली ताकद दे, उदंड आयुष्य दे चांगली शक्ती दे, ज्या पद्धतीने महाराष्ट्र हिताचे जे ते निर्णय घेत आहे तसे भविष्यात देखील चांगले निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी होऊ दे. चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राचा हित घडवणारा चांगला मुख्यमंत्री मिळाला हा संदेश सर्व देशात जाऊन दे अशी मागणी मी आईकडे केली असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना नेमकी कोणाची हे ज्योतिषाकडे बघण्याची आवश्यकता नाही ते अतिशय स्पष्ट झालेले आहे आणि उद्या न्यायालयीन निवडणुका आयोगाचे निर्णय लागले तर मग अधिक स्पष्टतेने समोरील माझ्या मते कुठलीही निश्चिंत शंका नाही असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा जसे आता बाहेर पडले त्याआधी अडीच वर्ष आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना लोकांना नेत्यांना भेटले असते तर आज दोन मेळावे झाले नसते शिवसेना कुठली ती फक्त उद्धवजींच्यामुळे दोन गट झाले आहे त्याला फक्त उद्धवजी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
जसे मातोश्रीचे दरवाजे उघडे ठेवले शिवसेना भवनाचे दरवाजे स्वतःहून उघडे ठेवले आहे आणि आता लोकांना देखील भेटत आहे, त्यावेळेस आमदारांचा ऐकून घेतलं असतं भेटायला जरी दिले असते तर आज ही वेळ आली नसते, दोन झेंडे दोन बाजूला दोन मैदान दोन बाजूला दोन मेळावे दोन बाजूला माझ्या मनात ते दुःख आहे. मला समाधान होतं अशातला भाग नाही शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेत फूट पडावी दोन भाग पडावे हे मला देखील समाधानकारक नाही. मला देखील आता दुखवते तर आता उद्धव ठाकरे हिटलर बनले आहेत.
लोकशाही त्यांच्यामध्ये शिल्लक राहिलेली नाही शिवसेनाप्रमुखांची लोकशाही जी होती शिवसेनाप्रमुख नेत्यांच्या बैठका घ्यायच्या नेत्यांना विचारायचे कुठलीही गोष्ट असेल त्याच्यामध्ये विचार विनिमय होयचे साहेब गेल्यावर सर्व काही विषय संपला हम करोसो कायदा म्हणजे मीच आता ही वाईट वेळ आलेली आहे. मराठी न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना मराठी माणसांमध्येच फूट पाडण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे त्याचे मला दुःख असल्याचे रामदास कदम म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"