मुंब्रा येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेस २0 हजार रुपयांची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 08:08 PM2018-04-26T20:08:13+5:302018-04-26T20:08:13+5:30

एका कंत्राटदाराच्या कामामध्ये विरोधी भूमिका न घेण्याच्या मोबदल्यात २0 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेस गुरूवारी रंगेहाथ अटक करण्यात आली.

NCP corporator of Mumbra Arrested while taking a bribe of Rs 20,000 | मुंब्रा येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेस २0 हजार रुपयांची लाच घेताना अटक

thane

Next
ठळक मुद्देकंत्राटदारास मागितली लाचदुरूस्ती कामाची केली होती तक्रारलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

ठाणे : एका इमारतीच्या दुरूस्तीच्या कामात अडथळा न आणण्यासाठी २0 हजार रुपयांची लाच स्विकारताना मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेस लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरूवारी रंगेहाथ अटक केली.
मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरात एका इमारतीचे दुरूस्तीचे काम सुरू होते. या कामाविरोधात स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता सातपुते यांनीही या वादामध्ये उडी घेत कंत्राटदाराची तक्रार केली. आपल्या तक्रारीचा प्रभावी पाठपुरावा घेऊन इमारतीचे काम आपण बंद पाडू शकतो, अशी धमकी या नगरसेविकेने संबंधित कंत्राटदारास दिली होती. काम सुरळीत ठेवायचे असल्यास ५0 हजार रुपये देण्याची मागणी नगरसेविकेने केली. संबंधित कंत्राटदाराने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे कंत्राटदाराने नगरसेविकेशी वाटाघाटी केल्या. ४५ हजार रुपयांमध्ये या प्रकरणाचा निपटारा करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे २0 हजार रुपयांचा पहिला हफ्ता गुरूवारी देण्याचे निश्चित झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही रक्कम स्विकारताना सुनिता सातपुतेला अटक केली. मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली आंधळे करीत आहेत.

Web Title: NCP corporator of Mumbra Arrested while taking a bribe of Rs 20,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.