फेसबुक पोस्टवर राष्ट्रवादीचा अधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 02:59 AM2019-04-21T02:59:37+5:302019-04-21T02:59:49+5:30

व्हॉट्सअ‍ॅपवरही व्हिडीओ माध्यमातून प्रचार

NCP is more on Facebook post | फेसबुक पोस्टवर राष्ट्रवादीचा अधिक भर

फेसबुक पोस्टवर राष्ट्रवादीचा अधिक भर

Next

ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीत दोन प्रमुख पक्षांमध्ये निवडणुक होत आहे. त्यामध्ये शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी असा सामना रंगत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी सोशल मिडियावर जास्तीचा भर दिल्याचे त्यांच्या फेसबुक पेज आणि व्हॉट्स अ‍ॅपवरील पोस्टवरुन स्पष्ट होत आहे. यासाठी वॉर रुमसुध्दा सज्ज ठेवण्यात आले असून रोज १२ ते १५ तास काम या रुममधून सुरु आहे.

तरुण मतदारांना आर्कषित करण्यासाठी आणि त्यांची मते मिळविण्यासाठी सोशल मिडियाचा वापर हा मागील काही वर्षात वाढला आहे. आता लोकसभा निवडणुकीतही सोशल मिडियाचा आधार घेतला जात आहे. ठाणे लोकसभेचे राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचे फेसबुकला सध्या दोन पेज कार्यरत असून दिवसातून त्यावर २० हून अधिक पोस्ट, व्हिडीओ पडत आहेत. यामध्ये उमेदवाराचा इन्टरव्ह्यु, त्यांच्या नेत्यांच्या मुलाखती आदी सुध्दा फेसबुकला टाकले जात आहे. आनंद परांजपे यांच्या आॅफीशल पेजला सध्या ३६ हजार ५८० लाईक्स मिळाल्या आहेत. तर प्रत्येक पोस्टला २ ते अडीच हजार लाईक्स मिळत आहेत. तर दुसऱ्या पेजला मात्र तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. फेसबुक बरोबर व्हॉट्सअ‍ॅपवर सुध्दा रोजच्या रोज प्रचार फेरी, चौक सभा, व्हिडीओ आदी विषय पोस्ट केल्या जात असून याचा आकडा ८ ते १० च्या घरात आहे.

कशी चालते यंत्रणा?
संपूर्ण मतदार संघाची माहिती रोजचे रोज अपडेट केले जात आहे. कोणत्या मतदार संघात किती मतदार आहेत. फेसबुकच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून केल्या जाणाºया टिकेला प्रतिउत्तर तत्काळ दिले जात आहे. शिवाय व्हिडीओच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या वॉररुममध्ये ८ ते १० लोक काम करीत असून दिवसातील १२ ते १५ तास केले जात आहे. मतदारांचा डाटा तयार करणे, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकला पोस्ट टाकणे.

36,580 लाइक्स राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या फेसबुक पेजला आहेत. त्यांच्या पेजवरून रोज १५ ते २० पोस्ट टाकल्या जातात. दररोजच्या दौऱ्यांचे अपडेट्सही दिले जातात.

12542 जणांना परांजपे यांच्या वॉर रूमच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या रोज पोस्ट पाठवल्या जातात. त्यातील अनेक कार्यकर्ते या पोस्ट नंतर व्हायरल करतात.

Web Title: NCP is more on Facebook post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.