भाईंदरमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 06:51 PM2020-12-08T18:51:15+5:302020-12-08T18:51:23+5:30
कार्यकर्ते रस्त्यावर जमल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
मीरारोड - शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांच्या विरोधा साठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाईंदर येथे निदर्शने करण्यात आली . कार्यकर्ते रस्त्यावर जमल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली .
भाईंदर पूर्वेच्या फाटक येथील महाराणा प्रताप ह्यांच्या पुतळ्या समोर जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर सह साजिद पटेल , सुप्रिया माईणकर, जक्की पटेल, प्रकाश मुरकुटे , अमितसिंग ठाकूर, अल्ताफ सिद्धीकी, ताहीर जमीनदार, प्रेम यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजपा आणि मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगत केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांना मूठभर उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करत शेतकरी हिताच्या विरोधातील काळे कायदे रद्द करा अशी मागणी असल्याचे पेंडुरकर म्हणाले .