‘लेखणीबंद’मुळे मुद्रांकांचा नऊ कोटींचा महसूल बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:37 PM2020-10-01T23:37:46+5:302020-10-01T23:38:09+5:30

कर्मचाऱ्यांचे आंदोलन : जिल्ह्यात २६ कार्यालयांतील काम ठप्प

Nine crores of stamp revenue was lost due to 'Lekhani Bandh' | ‘लेखणीबंद’मुळे मुद्रांकांचा नऊ कोटींचा महसूल बुडाला

‘लेखणीबंद’मुळे मुद्रांकांचा नऊ कोटींचा महसूल बुडाला

Next

ठाणे : प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व २६ कार्यालयांतील जमिनी, घरे आदींच्या खरेदी, विक्री व नोंदणीच्या कामांद्वारे मिळणारा एका दिवसाचा सुमारे नऊ कोटींचा महसूल बुडाल्याचा अंदाज कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे. तर, काम होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

या राज्यस्तरीय आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरी भागातील १७ व ग्रामीणच्या नऊ आदी २६ कार्यालयांतील अराजपत्रित अधिकारी व कर्मचाºयांनी सहभाग घेतला असल्याचे नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे सचिव प्रवीण गिरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संतोष देबडे व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
५० लाखांचे जीवन विमा कवच त्वरित लागू करणे, निधन झालेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देणे, सह दुय्यम निबंधक वर्ग-२ व दुय्यम निबंधक श्रेणी-१ रिक्त पदे भरणे

एका दिवसाचा आर्थिक फटका

च्ग्रामीणमधील अंदाजे दीड ते दोन कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्काचे ५० ते ६० लाख रुपये
च्ठाणे शहरात तब्बल सहा ते सात कोटी मुद्रांक शुल्क जमा होते, ते गुरुवारी बुडाले.

कार्यालयांतील अराजपत्रित अधिकारी व कर्मचाºयांचा आंदोलनात सहभाग.

Web Title: Nine crores of stamp revenue was lost due to 'Lekhani Bandh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड