बायोगॅस प्रकल्प ठरला नापास; सोसायट्यांची कचरा वर्गीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:09 AM2019-04-25T01:09:08+5:302019-04-25T01:10:41+5:30

आयरे प्रकल्पात प्रक्रियेसाठी रोज चार टनच कचरा

No biogas project Lessons to the Society's garbage classification | बायोगॅस प्रकल्प ठरला नापास; सोसायट्यांची कचरा वर्गीकरणाकडे पाठ

बायोगॅस प्रकल्प ठरला नापास; सोसायट्यांची कचरा वर्गीकरणाकडे पाठ

Next

- अनिकेत घमंडी 

डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील कचऱ्याचा प्रश्न ज्वलंत ठरत आहे. ओल्या कचºयाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी आयरेगावात १० टन कचºयाच्या क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प सुरू केला. मात्र, सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणीच होत नसल्याने या प्रकल्पात रोज ३.५ ते चार टनच कचरा येत आहे. पालिकेकडून वर्गीकरणाबाबत नरमाई दाखवली जात असल्यानेच बायोगॅस प्रकल्पाचा उद्देशच फसत असल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे उभारलेला आयरेगावातील हा प्रकल्प ‘ग’ प्रभागक्षेत्रात येतो. या प्रभागक्षेत्रात नऊ प्रभाग असून सुमारे दोन हजार सोसायट्यांमध्ये ओला-सुका कचºयाच्या वर्गीकरणाचा बोºया वाजला आहे. शहरातील अन्य ‘फ’, ‘ह’, ‘आय’, ‘ई’ या प्रभागांमध्येही वर्गीकरण होत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनीच सांगितले. पर्यावरणाचा ºहास आणि आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरील कचºयाची समस्या कमी करण्यासाठी बायोगॅस प्रकल्प राबवण्यात आला. मात्र, त्यासाठी आवश्यक कचºयाचे वर्गीकरणच होत नसल्याने क्षमतेनुसार कचरा या प्रकल्पास मिळत नाही. त्यामुळे हा प्रकल्प असून नसल्यासारखाच झाला आहे. या प्रकल्पात केवळ शहरातील विविध हॉटेलमधून रात्री गोळा केलेला कचरा येत आहे. याठिकाणी ठेवलेल्या नोंदवहीत अनेकदा कचºयाची अंदाजे नोंद केली जाते. मात्र, प्रकल्पात सरासरी ३.५ ते चार टन कचरा येतो. त्यावर प्रक्रिया करून बायोगॅसनिर्मिती केली जात असल्याचे बायोगॅस प्रकल्पाचे सुपरवायझर जीवन केणे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोय अधिकारी विलास जोशी यांनी या प्रकल्पाला बुधवारी भेट दिली. या प्रकल्पात सहा टनच कचरा येत असल्याची नोंद होती; मात्र याबाबत जोशी यांना खात्रीशीर सांगता आले नाही. त्यानंतर, त्यांनी आरोग्य निरीक्षक प्रभात शिंदे यांना अधिक प्रभावीपणे हा प्रकल्प चालवण्याचे सूचित केले. जोशी म्हणाले की, कचºयाचे वर्गीकरण न करणाºया २५ इमारतींवर वर्षभरात दंडात्मक कारवाई केली आहे. सुमारे ५० हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

मात्र, ही प्रभावी कारवाई नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. दरम्यान, प्रकल्पाच्या ठिकाणच्या कर्मचाºयांच्या आरोग्यासाठी मास्क, हॅण्डग्लोज, सेफ्टी बूट नसल्याचेही यावेळी निदर्शनास आले. दरम्यान, नगरसेवक मुकुंद पेडणेकर म्हणाले की, आमच्या प्रभागात कचºयाची समस्या भेडसावत आहे. म्हात्रेनगरपासून आयरे येथील बायोगॅस प्रकल्प जवळच आहे. मात्र, येथील सोसायट्यांकडूनही ओला-सुका कचरा वर्गीकरण केले जात नाही. त्यासंदर्भात महापालिकाही कसली विचारणा करत नाही. रात्रंदिवस कचरा विविध ठिकाणी रस्त्यावर पडलेला असतो, असेही त्यांनी सांगितले.

कचरा वर्गीकरण न करणाºयांवर कारवाई करणार
सोसायट्यांमधून ओला-सुका कचरा वर्गीकरण केले जात नाही, ही बाब गंभीर आहे.
त्यासंदर्भात २ मे नंतर संबंधित आरोग्य निरीक्षकांकडून ओला-सुका कचरा वर्गीकरणाची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात येईल.
ज्या सोसायट्या प्रतिसाद देणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे केडीएमसीचे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी सांगितले.

Web Title: No biogas project Lessons to the Society's garbage classification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.