लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत नोंदणी झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या चार लाख ७२ हजारांहून अधिक असून, त्यामधील सुमारे सात हजार ५८४ जण क्रिटिकल झोनमध्ये राहिले आहेत. त्यामध्ये सात हजार नऊ जणांना ऑक्सिजनची कमतरता भासली आहे. उर्वरित ५७५ जण हे व्हेंटिलेटरवर असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. यापैकी सहा हजार ४८१ रुग्ण जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रातील आहेत, तर नगरपालिका आणि ग्रामीण भागात ११२ रुग्ण आहेत.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली. २६ मार्च रोजी कोरोना रुग्णांची संख्या ही तीन लाख २ हजार ५५९ इतकी होती. ती संख्या आता चार लाख ७२ हजार ७९० वर पोहोचली आहे. यावरून कोरोनाच्या लाटेचा अंदाज येऊ शकतो. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ७२ हजार ७९० कोरोनाग्रस्तांपैकी चार लाख २७ हजार ५५८ जणांनी कोरोनाला हरवले आहे, तर सात हजार ६९१ जणांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे. सध्या जिल्ह्यात ३७ हजार ५४१ जण कोरोनाशी दोन हात करत आहेत. यापैकी ७ हजार ५८४ जण क्रिटिकल आहेत. यामध्ये सात हजार नऊ जणांना ऑक्सिजनची आवश्यक आहे. ५७५ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सहा महापालिका कार्यक्षेत्रात ५ हजार ९४७ जणांना ऑक्सिजन, तर ५३४ जण व्हेंटिलेटरवर आहेत. नगरपालिकांमध्ये ९५६ जण ऑक्सिजन, तर ३५ जण व्हेंटिलेटरवर असून, ग्रामीण भागात १०६ जण ऑक्सिजन, तर अवघे सहा जण व्हेंटिलेटरवर असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. महापालिका या दृष्टीने आवश्यक त्या उपाययाेजना करत आहे.
nत्यापैकी २५२ जणांना ऑक्सिजन, तर २५ रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे दिसत आहे. दिलासादायक म्हणजे ग्रामीण भागात जरी रुग्णसंख्या तीन हजार ४३ इतकी असली, तरी तेथे १०६ जणांना ऑक्सिजनची, तर ६ जणांना व्हेंटिलेटरची गरज लागल्याचे दिसत आहे. nमहापालिका आणि नगरपालिका क्षेत्रापेक्षा ग्रामीण भागात परिस्थिती उलटी असल्याचे प्रखरतेने जाणवत आहे.
nपहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची सर्वांत कमी नोंदणी जिल्ह्यातील भिवंडी महापालिका हद्दीत झाली. भिवंडीत सध्याच्या घडीला कोरोनाबाधित म्हणून उपचारार्थ ४०१ रुग्ण दाखल आहेत.
जिल्ह्यातील रुग्णांचा तक्तास्वराज संस्था उपचारार्थ ऑक्सिजन व्हेंटिलेटरठामपा ८७८४ ९८३ १७९नवी मुंबई ५८०६ १६९५ २००केडीएमसी १०९६२ १९५९ ०४०मीरा-भाईंदर ३९०४ ९११ ०८९भिवंडी ०४०१ २५२ ०२५उल्हासनगर १४४५ १४७ ००१अंबरनाथ १७४९ ४४८ ०१२बदलापूर १४४७ ५०८ ०२३ठाणे ग्रामीण ३०४३ १०६ ००६एकूण ३७५४१ ७००९ ५७५