घोडबंदर रोडवर ऑईल टँकर दुभाजकाला धडकला; ५ तासांनंतर वाहतूक सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 08:13 AM2021-10-14T08:13:12+5:302021-10-14T08:13:31+5:30

ओझीर चौधरी यांच्या मालकीचा टँकर घेऊन चालक झिलू रमण हा गुजरात हुन घोडबंदर रोडने ठाणे मार्गे शीळफाटा येथे निघाला होता. त्या टँकरमध्ये २१ टन तेलाने भरला होता.

Oil tanker hits divider on Ghodbunder Road; Traffic smooth after 5 hours | घोडबंदर रोडवर ऑईल टँकर दुभाजकाला धडकला; ५ तासांनंतर वाहतूक सुरळीत

घोडबंदर रोडवर ऑईल टँकर दुभाजकाला धडकला; ५ तासांनंतर वाहतूक सुरळीत

Next

ठाणे: भट्टीच्या तेलाने भरलेला टँकर घेऊन जाताना चालकाचा त्याच्यावरील ताबा सुटल्याने तो टँकर रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकाला जाऊन जोरात धडकल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास गायमुख जकात नाक्याजवळ घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसली तरी घोडबंदर रोडवरील ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीच्या रस्तावर मोठ्या प्रमाणात तेल सांडले होते. त्यामुळे पुन्हा: एकदा घोडबंदर रोड तेलाने रात्रभर रोखून धरला होता. पहाटे सहा वाजेपर्यंत ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या एकूण १६ जणांच्या पथकाने तो रस्ता पाण्याने धुवून काढला. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर माती पसरवून तो रस्ता सकाळी वाहतुकीसाठी खुला केल्याची माहिती आपत्ती कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ओझीर चौधरी यांच्या मालकीचा टँकर घेऊन चालक झिलू रमण हा गुजरात हुन घोडबंदर रोडने ठाणे मार्गे शीळफाटा येथे निघाला होता. त्या टँकरमध्ये २१ टन तेलाने भरला होता. गायमुख जकात नाक्याजवळ आल्यावर चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि तो थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर जाऊन जोरात आदळला. ही धडक इतकी जोरात होती की त्या टँकरमधून मोठया प्रमाणात तेल गळती झाली. यामुळे ज्या ठिकाणी अपघात झाला होता तो रस्ता तेलमय झाल्याने ठाण्याकडे येणारी वाहतुकी पूर्णपणे थांबविण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल यांच्या कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात तेल पसरल्याने रस्ता तेल मय झाला होता. त्यामुळे तातडीने तो रस्ता पाण्याच्या मदतीने धुवून काढण्याचे काम हाती घेण्यात आले.

येवढेच नाहीतर त्या रस्त्यावर मातीचा मार करून त्यानंतर तो रस्ता सकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास वाहनांसाठी सुरू करण्यात आली. रात्रभर एक मार्गिका बंद राहिल्याने सकाळच्या सुमारास घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे येणारी वाहतूक कासवगतीने मार्गक्रमण करीत होती. यावेळी एक फायर इंजिन, एक जम्बो पाण्याचा टँकर आणि एक रेस्क्यू वाहन तसेच दोन जेसीबी यांना पाचारण केल्याची माहिती कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.

Web Title: Oil tanker hits divider on Ghodbunder Road; Traffic smooth after 5 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.