ठाणे : पंतप्रधान पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती कळविण्यासाठी विमा कंपनीने जटिल अटी लागू केल्या होत्या; मात्र आता शेतकऱ्यांना सहा पर्यायांपैकी एकाच्या माध्यमातून नुकसानीची माहिती विमा कंपनीला ७२ तासांत कळवणे आवश्यक केले आहे.
२) हे आहेत नवीन सहा पर्याय ( बॉक्स) -
१) क्रॉप इन्शुरन्स ॲपवर नोंद करणे.
२) विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून नुकसानीची माहिती देणे.
३) विमा कंपनीच्या ई-मेलवर नुकसानीची माहिती पाठवणे.
४) विमा कंपनीच्या तालुकास्तरीय कार्यालयात जाऊन नुकसानीची माहिती देणे.
५) कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन नुकसानीची नोंद करणे.
६) ज्या बँकेत विमा जमा केला त्या बँकेच्या शाखेत जाऊन नुकसानीची जाणीव करून देणे.
---------------------
जुलैत जिल्ह्यातील ७८२ हेक्टर शेतीचे-
जिल्ह्यात जुलै महिन्यात तब्बल ९०० मिमी पाऊस पडलेला आहे. या कालावधीत अतिवृष्टीने ७८२ हेक्टर शेतजमिनीसह भातपिकाचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. याचा फटका जिल्हाभरातील दोन हजार ९०८ शेतकऱ्यांना बसला आहे. या भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना आजघडीला मिळणे गरजेचे आहे.
या अतिवृष्टीत भिवंडी तालुक्यात तब्बल २४२.७० हेक्टर भातपिकांचे नुकसान झाले. या खालोखाल अंबरनाथला १५० हेक्टर, शहापूरला ११२.४० हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. कटक ठाणे येथील दोन हेक्टर शेतजमीन वाहून गेली. मुरबाड येथील २० हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. भिवंडी तालुक्यामधील ०.५० हेक्टरमधील फळबागांचे नुकसान झालेले आहे.
----------------
शेतपिकांचे नुकसान झाल्यास पीकविमा कंपनीला ७२ तासात नुकसानीचा अहवाल देणे अपेक्षित आहे. त्यासाठी विमा भरलेल्या बँकेला कळवले तरी चालेल. विमा कंपनीच्या ई मेलवर नुकसानीची पाठवली तरी चालेल. विमा कंपनीच्या टोल फ्री दूरध्वनीवर नुकसानीची माहिती दिली तरीही चालेल. शेतकऱ्यांस वैयक्तिक पंचनाम्याद्वारे ही विमा रक्कम मिळणे शक्य आहे.
- अंकुश माने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे.
-------------