लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : सरकार कोणतेही असो त्याला महागाईवर नियंत्रण ठेवता आलेले नाही. कोरोनामुळे वर्षभरापासून नागरिक बेजार आहेत. सामान्य आणि हातावरचे पोट असलेल्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काहींचा रोजगार गेला तर काहींची वेतन कपात झाली आहे. असे असताना महागाईही सगळ्य़ाच बाजूने वाढत आहे. इंधनाचे भाव वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला. त्यामुळे किराणा माल आणि तेलाचे दरही वाढले. परिणमी, सर्वांचेच बजेट कोलमडले आहे.
कोरोनामुळे केंद्र सरकारने देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार, कंपन्या, उद्योग ठप्पे झाले. परिणामी आर्थिक तूट भरून काढण्यासाठी कंपन्यांनी वेतन कपात केली, तर काहींनी मनुष्यबळही कमी केले. त्यामुळे अनेकांच्या हातचे काम गेले. परिणामी प्रत्येकाचेच आर्थिक गणितच बिघडले. मात्र, दुसरीकडे वर्षभरात महागाईदेखील सतत वाढत होती. कोरोनाकाळात सरकारला वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यास अपयश आले. मागील वर्षभरात डिझेल २० रुपयांनी महागले आहे. तर, किराणा मालाची ३० टक्के भाववाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींकडून महागाईच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
---------------
काय गृहिणी म्हणतात?
१. कोरोनाकाळात नागरिकांना महागाईतून तरी दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र गेल्या वर्षभरात किराणा, तेलाचे भाव वाढले आहे. ही एक प्रकारे सरकारने महागाईचीच फोडणी दिली आहे.
- नलिनी जाधव
२. सामान्य नागरिक कोरोनाच्या संकटात होरपळलेला असताना त्यात आणखी महागाई वाढवून सामान्यांचे जगणे मुश्कील करण्यात आले आहे. सरकारला किमान कोरोना काळाचे तरी भान असायला हवे होते.
- शैलजा चौरे
३. इंधनाचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला. त्यामुळे किराणा आणि तेलाचे भाव वाढले. सामान्य नागरिकाला जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीतही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे ते त्यात भरडला जात आहेत.
-किरण दाबके
--------------
किराणा दर (प्रति किलो)
तूरडाळ
मार्च २०२०- १०० रुपये
सप्टेंबर २०२०- १०५ रुपये
मे २०२१- ११० रुपये
चणाडाळ
मार्च २०२०- ६० रुपये
सप्टेंबर २०२०- ६५ रुपये
मे २०२१-८० रुपये
तांदूळ
मार्च २०२०-४५ रुपये
सप्टेंबर २०२०-५० रुपये
मे २०२१-६० रुपये
साखर
मार्च २०२०- ३५ रुपये
सप्टेंबर २०२०- ३६ रुपये
मे २०२१- ३८ रुपये
गूळ
मार्च २०२०- ५० रुपये
सप्टेंबर २०२०- ५५ रुपये
मे २०२१-६० रुपये
बेसन
मार्च २०२०- ७० रुपये
सप्टेंबर २०२०- ७५ रुपये
मे २०२१- ८० रुपये
-----------------
तेलही महागले (प्रति लिटर)
शेंगदाणा
मार्च २०२०- १३५ रुपये
सप्टेंबर २०२०- १४५ रुपये
मे २०२१- १७० रुपये
सूर्यफूल
मार्च २०२०- ४५ रुपये
सप्टेंबर २०२०- १३५ रुपये
मे २०२१- १६८ रुपये
राईसबन
मार्च २०२०- ९५ रुपये
सप्टेंबर २०२०- ११५ रुपये
मे २०२१- १५० रुपये
सोयाबीन
मार्च २०२०- ८० रुपये
सप्टेंबर २०२०- १५५ रुपये
मे २०२१- १५० रुपये
पामतेल
मार्च २०२०- ९० रुपये
सप्टेंबर २०२०- १०५ रुपये
मे २०२१- ११८ रुपये
------------------
डिझेल (प्रति लिटर)
जानेवारी २०२०- ६८.२९ रुपये
जून २०२०-७४.२१ रुपये
जानेवारी २०२१- ७८.९८ रुपये
मे २०२१- ८८.६७ रुपये
--------------------