ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे फक्त ५५१ नवे रुग्ण आढळले; १४ जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 07:52 PM2020-10-26T19:52:24+5:302020-10-26T19:52:31+5:30

CoronaVirus in Thane : उल्हासनगरला १२ रुग्ण सापडले आणि एकाचा मृत्यू झाला आहेत. येथील दहा हजार १११ रुग्ण संख्येबरोबर मृतांची संख्या ३३४ झाली आहे. 

Only 551 new cases of corona were found in Thane district; 14 died | ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे फक्त ५५१ नवे रुग्ण आढळले; १४ जणांचा मृत्यू 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे फक्त ५५१ नवे रुग्ण आढळले; १४ जणांचा मृत्यू 

Next

ठाणे : जिल्ह्यात सोमवारीही रुग्ण संख्येत कमालीची घट झालेली आढळून आल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. फक्त ५५१ रुग्णं सोमवारी आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख सात हजार ५९२ रुग्ण संख्या झाली आहे. तर १४ जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या पाच हजार २४० झालेली आहे, असे जिल्हा रुग्णालयाने सांगितले आहे. 

               या रुग्णांपैकी ठाणे शहरात १३० रुग्ण नव्याने सापडले आहेत.या शहरात आता ४५ हजार ५४१ रुग्ण झाले आहेत. तर, तीन मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या एक हजार १३३ आहे. कल्याण - डोंबिवलीत १०९ नवे रुग्ण आढळून आले असून दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे ४९ हजार २९१ रुग्ण बाधीत झालेले असून मृतांची संख्या ९९५ झाला आहे. 

            उल्हासनगरला १२ रुग्ण सापडले आणि एकाचा मृत्यू झाला आहेत. येथील दहा हजार १११ रुग्ण संख्येबरोबर मृतांची संख्या ३३४ झाली आहे. भिवंडीला फक्त सहा बाधीत आढळून आले असून एकाचा  मृत्यू झाला आहे.  बाधीत पाच हजार ८३२ झाले असून मृत्यू ३३१ नोंदले आहेत. मीरा भाईंदरमध्ये ७७ रुग्णांची तर आज एका मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात २२ हजार १२६ बाधितांसह आता मृतांची संख्या ६९९ झाली आहे.

     अंबरनाथमध्ये १३ रुग्णं सापडले असून आज एक मृत्यू झाला आहे. येथे बाधितांची संख्या सात हजार १८५ असून मृत्यू २६१ आहेत. बदलापूरमध्ये २३ रुग्णांचा शोध नव्याने घेण्यात आल्यामळे बाधीत सात हजार २१६ झाले आहेत. या शहरात आज एकही मृत्यू झाला नाही. मृत्यूची संख्या ९६ कायम आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये ५९ रुग्ण सापडले असून एक मृत्यू झाला आहे. या क्षेत्रात बाधितांची संख्या १६ हजार ५४२ झाली असून मृतांची संख्या ५०९ आहे. 

Web Title: Only 551 new cases of corona were found in Thane district; 14 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.